
अगर तबरेज को इंसाफ़ नहीं मिला तो हम हिन्दू 1600 परिवार है तकरीबन 8000 लोग है हम इस्लाम कबूल कर लेंगे – सुनिये इस हमारे सच्चे रामभक्त की बात, अशी एक पोस्ट मोहम्मद हसन ओलाई यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
झारखंडमध्ये मॉब लिंचिंगमध्ये तरबेजचा मृत्यू झाला होता. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हिंदू व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांसोबत इस्लाम स्वीकारण्याची धमकी देत आहे कारण त्याची इच्छा आहे की, तरबेज अन्सारीला न्याय मिळावा. हा व्हिडिओ नीट ऐकला असता यात कुठेही तरबेजच्या नावाचा उल्लेख आढळून येत नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होते. तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही या व्हिडिओची छायाचित्रे घेत ती रिव्हर्स इमेज सर्चद्वारे पडताळली. यातून आम्हाला अपेक्षित परिणाम मात्र मिळाले नाहीत. आम्हाला हा व्हिडिओ नीट ऐकल्यावर समजले की, व्हिडिओत सुरुवातीला बोलणारी व्यक्ती ‘हम शिक्षाकर्मी’ असे म्हणत आहे. त्यानंतर आम्ही ‘शिक्षामित्रों ने दी इस्लाम कुबूल करने की धमकी’ असे यूटूयूबवर टाकल्यावर आम्हाला विवरणासोबत मूळ व्हिडिओ मिळाला. ‘Tedhi Ungli’ नावाच्या एका यूजरने 31 जुलै 2017 रोजी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ नीट पाहिल्यावर आणि ऐकल्यावर लक्षात येते की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेश या राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांचा आहे. या शिक्षकांना अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरीतून कमी करण्यात आले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली पण त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. या नैराश्यातून ते इस्लाम कबूल करण्याची धमकी देत आहेत. आपण हा संपूर्ण व्हिडिओ खाली पाहू शकता.
या तथ्य पडताळणीतून हे स्पष्ट झाले आहे की, हा व्हिडिओ दोन वर्ष जुना आहे. या व्हिडिओचा तरबेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणाशी काही संबंध नाही.
निष्कर्ष
तरबेज अन्सारीला न्याय न मिळाल्यास 1600 हिंदू इस्लाम स्वीकारणार असल्याची या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती असत्य असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तरबेजला न्याय न मिळाल्यास 1600 हिंदू कुटूंब इस्लाम स्वीकारणार?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
