FAKE: ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’? वाचा सत्य

False राजकीय

मणिपूरच्या 26 वर्षीय चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ती भारतात परतल्यावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. सरकारतर्फे तिचा सत्कारसुद्धा करण्यात आला. या सोहळ्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल फोटोमध्ये चानूच्या सत्कार सोहळ्यात ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’ असे लिहिलेले पोस्टर दिसते. यावरून सोशल मीडियावर टीका केली जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो बनावट आढळला.

काय आहे दावा?

मीराबाई चानू यांच्या सत्कार सोहळ्यातील फोटोमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू दिसतात.  त्यांच्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले पोस्टर आहे. त्यावर लिहिलेले आहे की, “धन्यवाद मोदी जी. मीराबाई चानू को मेडल दिलाने के लिए”. 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू 26 जुलै रोजी कोच विजय शर्मा यांच्यासह भारतात परतली. विमानतळावर तिचे थाटात स्वागत करण्यात आले. यानंतर 27 जुलै रोजी केंद्रीय क्रीडमंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी तिचा सत्कार करण्यात आला होता. 

दूरदर्शन वाहिनीवरील बातमीमध्ये या कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखविण्यात आला होता. त्यामध्ये दिसते की, मागच्या पोस्टर व्हायरल फोटोप्रमाणे काहीही लिहिलेले नाही. 

डीडी न्यूज चॅनेलच्या युट्यूब अकाउंटवरील स्क्रीनशॉट

पत्र व सूचना कार्यालयानेदेखील या कार्यक्रमाची ट्विटरवर व्हिडिओ व बातमी प्रसिद्ध केली होती. पीआयबीच्या वेबसाईटवर व्हायरल होत असलेला मूळफोटोदेखील उपलब्ध आहे. 

मूळ फोटो आणि व्हायरल फोटो यांची तुलना केल्यावर लगेच कळते की, पोस्टरवर वादग्रस्त मजकूर लिहिलेला नाही. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’ असे लिहिलेला फोटो एटिड केलेला नाही

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE: ‘मीराबाई चानूला पदक मिळवून दिल्याबद्दल मोदींचे अभिनंदन’? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False