भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांची उमेदवारी धोक्यात ? : सत्य पडताळणी

Mixture/अर्धसत्य राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर बीड जिल्हा सध्या गाजतोय. बीड जिल्ह्यातील लोकसभा 2019 साठी भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होइपर्यंत या पोस्टला सोशल मीडियावर 27 शेअर, 503 लाईक्स, 09 कमेंटस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

फेसबुकवर खाली दिलेल्या पेजवरही अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे.

सत्य पडताळणी

व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी गुगलवर खासदार प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज असे टाईप केले. तसेच गुगलवर बीड जिल्हाधिकारी असे टाईप करुन माहिती घेतली.

भाजप लोकसभा 2019 उमेदवार प्रितम मुंडे यांनी निवडणूक अर्ज भरल्यानंतर बीडमध्ये तणाव निर्माण झाला होता. भाजप उमेदवार प्रितम मुंडे यांनी निवडणूक अर्जात चुकीची माहिती दिली आहे, असे कारण पुढे करत हा निवडणूक अर्ज रद्द करावा या आशयाचा अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला होता. या संदर्भात विविध सोशल माध्यमात आणि वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र टुडेअर्काईव्ह

युट्यूबवर एबीपी माझा या चॅनलवर 27 मार्च 2019 रोजी या विषयावर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण ही संपुर्ण घटना पाहू शकता.

भाजप लोकसभा 2019 उमेदवार प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज या प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेला एक व्हिडिओ धनंजय मुंडे यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर 27 मार्च 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण व्हिडिओ बघू शकता.

अर्काईव्ह

फॅक्ट क्रिसेंडो टीमने या संपुर्ण प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता, बीड निवडणूक आयोगासाठी काम करणारे तहसिलदार उदय मुळे यांनी प्रत्यक्ष फोनवर माहिती सांगितली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भाजप लोकसभा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरुन कॉंग्रेस कार्यकर्त्याला मारहाण झाली असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. परंतू भाजप उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज संदर्भातील आक्षेप अर्ज फेटाळला असून, खासदार प्रितम मुंडे यांची उमेदवारी अर्ज वर्तमान परिस्थितीत धोक्यात नाही असे मुळे यांनी स्पष्ट केले आहे.

उदय मुळे, तहसिलदार,

बीड जिल्हाधिकारी कार्यालय.

खाली दिलेल्या लिंकवर आपण बीड जिल्हाधिकारी कार्यालय संदर्भात संपुर्ण माहिती वाचू शकता. या कार्यालयाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर जिल्ह्याविषयी या कॉलमवर क्लिक केले. त्यामध्ये कोण कोणाचे येथे क्लिक केल्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयाचा फोन नंबर सापडला.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयअर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात संपुर्ण प्रकरणाचे संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की, भाजप लोकसभा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या निवडणूक अर्जावरुन बीडमध्ये आक्षेप घेण्यात आला हे वृत्त् खरे आहे. परंतू, प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणारा अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फेटाळून लावण्यात आल्याने, भाजप लोकसभा उमेदवार यांची उमेदवारी धोक्यात आलेली नाही.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे भाजप लोकसभा 2019 बीडच्या उमेदवार प्रितम मुंडे यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेतला हे वृत्त् खरे आहे. परंतू हा आक्षेप अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील मजकूर भाजपच्या बीडच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी धोक्यात, निवडणुकीत हरण्यापेक्षा अर्ज बाद होणे केव्हाही चांगले हे तथ्य संमिश्र आहे.

Avatar

Title:भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांची उमेदवारी धोक्यात ? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •