अमित शहा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या कथित बैठकीचे एडिट केलेले फोटो व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या बैठकीचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अमित शहा ओवैसी यांना काही तरी सांगताना दिसतात.

ऐन निवडणुकीदरम्यान हा फोटो शेअर करून दोन्ही नेत्यांच्या छुप्या हितसंबंधांविषयी शंका उपस्थित केली जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा फोटो तर फोटोशॉप केलेला आहे. 

काय आहे फोटोत?

अमित शहा आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एकमेकांसोबतचा फोटो शेअर केलेला आहे. यात अमित शहा जणू काही ओवैसी यांना म्हणता आहेत, की “सगळं ठरल्या सारखं करायचं बरं का. तू हिंदुंना शिव्या घालायच्या, मगच ते घाबरून सगळे प्रश्न विसरुन भाजपकडे येतील.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा फोटो नेमका कधीचा ते शोधले. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, दोन वेगवेगळे फोटो एकत्र करून हा व्हायरल व्हिडिओ फोटो तयार करण्यात आला आहे. 

असदुद्दीन ओवैसी यांच्या फेसबुक पेजवर 2018 साली करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये पुढील फोटो आढळला. 28 फेब्रुवारी 2018 रोजी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, की असदुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांनी ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचे मुख्य सचिव अरविंद कुमार आणि आयुक्त जनार्दन रेड्डी यांची भेट घेऊन शहरात तयार होत असलेल्या पुलांविषयी निवेदन दिले होते.

मूळ पोस्ट – फेसबुक

फोटोमध्ये स्पष्ट दिसते की, ओवैसी यांच्यासमोर अमित शहा बसलेले नाही. 

ओवैसी बंधुंच्या या भेटीचा व्हिडिओसुद्ध उपलब्ध आहे. यावरून स्पष्ट होते, 

अमित शहा यांचा फोटो कुठून आला?

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ‘द ट्रिब्युन’ वेबसाईटवर अमित शहा आणि कॅप्टन अमरिंदर यांचा फोटो आढळला. कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदर यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. 

मूळ बातमी – ट्रिब्युन

याच फोटोला मिरर इमेज इफेक्ट देऊन ओवैसी यांच्या फोटोसोबत एकत्र एडिट करण्यात आला. 

खाली दिलेल्या तुलनेवरून हा फरक अधिक स्पष्ट होईल.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते, की दोन वेगवेगळ्या जुन्या फोटोंना एकत्र करून चुकीच्या संदर्भासह शेअर केले जात आहे. ओवैसी आणि अमित शहा यांच्या बैठकीचा हा फोटो नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अमित शहा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या कथित बैठकीचे एडिट केलेले फोटो व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False