अमानतुल्लाह खान यांचा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

False राजकीय | Political

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आमदार अमानतुल्लाह खान यांनी म्हटलंय की, ‘’अल्लाहने ठरवले आहे की, अत्याचार करणारे नष्ट होतील. आपण शरिया होऊ.’’ AAP चे अमानतउल्लाह खान

हे आहेत केजरीवाल यांचा पक्ष आपचे विचार, आता तुम्हीच विचार करा सगळे अल्लाहच ठरवेल की तुम्हीही काही ठरवाल? तुम्ही शरिया होऊ इच्छिता की नाही. 

अमानतुल्लाह खान यांनी खरोखरच असं वक्तव्य केलंय का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

अमानतुल्लाह खान यांनी खरोखरच काय वक्तव्य केले आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी आम्हाला या व्हिडिओत “Breaking News Express”  असा वॉटरमार्क दिसून आला. आम्ही या लोगोचा युटुयूबवर शोध घेतला. त्यावेळी या 45 सेकंदाच्या क्लिपचा पूर्ण मुळ व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ जवळपास सहा मिनिटाचा असून तो दोन फेब्रुवारी 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला “AMANULLAH KHAN, JAMIA MLA, WARNS ABOUT CAA, NRC & NPR” असे इंग्रजी शीर्षक देण्यात आलेले आहे.

Archive

हा व्हिडिओ पाहिल्यावर हे स्पष्ट झाले की हा निवडणुकीतील प्रचारसभेचा व्हिडिओ आहे. या प्रचारसभेत अमानतुल्लाह खान मत देण्याचे आवाहन करत आहेत. या सभेत ते स्पष्टपणे हम जरिया बनेगे असे म्हणत असल्याचे आपण ऐकू शकतो. ते हिंदीत नेमके काय म्हणाले हे आम्ही खाली दिले आहे.

इनके जो ज़ुल्म किए हैं, इन ज़ुल्मों का खात्मा इंशाअल्लाह ओखला से होगा, जामिया से होगा। हम जरिया बनेंगे इंशाअल्लाह और कहीं न कहीं से शुरुवात होती है |”

मुळ भाषणात आणि क्लिपमध्ये अमानतुल्लाह खान यांनी शरिया नव्हे तर जरिया असा शब्द वापरला असल्याचे दिसून येते. फॅक्ट क्रेसेंडोने ब्रेकिंग न्यूज एक्सप्रेसचे  खान यांनी भाषण दिले त्यावेळी ते त्याठिकाणी उपस्थित होते. या व्हिडिओतील भाषण त्यांनी जाकिरनगर येथे केले होते. या संपूर्ण भाषणात त्यांनी कुठेही शरिया या शब्दाचा प्रयोग केला नाही. त्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला याबाबत स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ देखील पाठवला. 

निष्कर्ष

भाषणात अमानतुल्लाह खान यांनी शरिया नव्हे तर जरिया असा शब्द वापरला असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजमाध्यमात ही व्हिडिओ क्लिप असत्य माहितीसह पसरविण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Avatar

Title:अमानतुल्लाह खान यांचा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False