वाईन शॉपसमोरील महिलांची रांग पुण्यातील नाही; जाणून घ्या तो व्हिडियो कुठला आहे

Coronavirus False सामाजिक

लॉकडाऊनदरम्यान मद्य विक्रीला परवानगी मिळताच दारुच्या दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा लागल्या. यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही उभे राहत असल्याचे दिसून आले. वाईनशॉप समोर रांगेत उभे असलेल्या महिलांचा असाच एक व्हिडियो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडियो पुण्यातील असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो बंगळुरू येथील असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील वाईन शॉपसमोर लागलेली महिलांची रांग म्हणून खालील व्हिडियो शेयर केला जात आहे. 

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोतील वाईनशॉपचा बोर्ड जरी पूर्ण दिसत नसला तरी दुकानाचे नाव “—U Wines @ MRP” असल्याचे दिसते. तसेच बाजूला देवकी डेंटल असा बोर्डअसून, त्यापलिकडे दुकानावर कन्नड भाषेतील फलक दिसतो. पुण्यातील एखाद्या दुकानाचा फलक कन्नड भाषेत असावा ही बाब आश्चर्याची आहे. त्यामुळे अधिक तपास करणे गरजेचे आहे.

wines.png

व्हिडियोच्या शेवटी एक जण शुटिंग करणाऱ्याला “तुम्ही कोण?” असे कन्नड भाषेत विचारतो. त्यावर ती व्यक्ती ‘इंडियन एक्सप्रेस’ असे म्हणते. हा धागा पकडून सर्च केले असता, द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राताच्या 5 मे 2020 रोजीच्या अंकात खालील छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचे आढळले. कॅप्शनुसार हा फोटो बंगळुरू शहरातील आहे. यामध्ये दुकानाचे नाव “Madhu Wines @ MRP” दिसते.

indianexpress.png

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’शी संबंधित फोटोग्राफरच्या ट्विटर खात्यावरुनही सदरील दुकानाबाहेरच्या गर्दीचा व्हिडियो शेयर केला गेला होता. यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडियो पुण्यातील नसून बंगळुरूमधील आहे.

अर्काइव्ह

‘द न्यूज मिनिट’चे पत्रकार प्रज्ज्वल यांनीदेखील बंगळुरूमधील या दुकानाबाहेरील गर्दीचा फोटो ट्विटरवर शेयर केला होता. या फोटोत या वाईनशॉपच्यावर देवकी डेंटल हा दवाखाना असल्याचे दिसते. यावरून सिद्ध होते की, हे वाईनशॉप पुण्यातील नाही.

अर्काइव्ह

निष्कर्ष

वाईन शॉपसमोर महिलांची रांग लागली असल्याचा हा व्हिडियो पुण्यातील नाही. हा व्हिडियो बंगळुरू शहरातील आहे. चुकीच्या माहितीसह हा व्हिडियो शेयर केला जात आहे.

Avatar

Title:वाईन शॉपसमोरील महिलांची रांग पुण्यातील नाही; जाणून घ्या तो व्हिडियो कुठला आहे

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False