जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून भारतीय वंशाचे अहमद खान यांची नियुक्ती झाली का? वाचा सत्य
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्यापासून काही भारतीय नावांची तेथील मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचे दावा सोशल मीडियावर केले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाचे अहमद खान यांना राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी सदरील व्हायरल मेसेज आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, हा दावा खोटा आहे.
काय आहे दावा?
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जो बायडन यांच्या सोबत अहमद खान यांचे फोटो शेयर करून कॅप्शन दिली की, जो बायडन यांनी मुळचे भारतीय असलेले अहमद खान (हैदराबाद) यांना राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे!
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम अहमद खान यांची अशी काही नियुक्ती झाली का याबाबत शोध घेतला. कुठल्याही अधिकृत वृत्तस्थळाने त्यांच्या निवडीची बातमी दिली नसल्याचे आढळले. त्यामुळे या दाव्याच्या सत्यतेविषयी शंका बळावली.
पोस्टमधील फोटोंना रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे फोटो 2015 मधील आहेत. ‘द हंस इंडिया’च्या बातमीनुसार, हा फोटो तत्कालिन उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अहमद खान यांना आमंत्रित करण्यात आले होते.
Screenshot: The Hans India news
मूळ बातमी – द हंस इंडिया । अर्काइव्ह
अहमद खान यांनीसुद्धा त्यांच्या फेसबुक खात्यावरून 10 नोव्हेंबर 2020 रोजी हे फोटो शेयर करून माहिती दिली होती की, अमेरिकेत 2016 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी जो बायडन यांच्या उमेदवारीसाठी ‘ड्राफ्ट बायडन 2016’ ही मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेचे अहमदखान उपकार्यकारी संचालक होते.
हेदेखील वाचा - जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का?
मात्र, त्यावेळी बायडन निवडणुकीसाठी उभे राहिले नव्हते. ‘ड्राफ्ट बायडन 2016’च्या टीमने केलेल्या कामगिरीबद्दल एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाची ही छायाचित्रे आहेत. म्हणजे ही सर्व जुनी छायाचित्रे आहेत.
शिकागोस्थित अहमद खान यांच्या सोशल मीडियावरसुद्धा ते ‘ड्राफ्ट बायडन 2016’ मोहिमेचे माजी उपकार्यकारी संचालक होते, एवढेच नमूद केलेले आहे. तेथेसुद्धा ते बायडन यांचे राजकीय सल्लागार असल्याचे म्हटलेले नाही.
सोशल मीडियावरील दाव्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी मग फॅक्ट क्रेसेंडोने (आसामी) अहमद खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ‘राजकीय सल्लागारपदी नियुक्ती’चे सर्व दावे निराधार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, “ही सर्व छायाचित्रे जुनी आहेत. ती चुकीच्या माहितीसह पसरविण्यात येत आहेत. 2016 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी जो बायडन यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ड्राफ्ट बायडन 2016’ या मोहिमेचा मी उपकार्यकारी संचालक होतो. बायडन यांना भविष्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवून देण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली होती. कदाचित यामुळे सोशल मीडियावर हा गैरसमज झाला असावा.”
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. चार वर्षांपूर्वी ते बायडन यांच्या एका मोहिमेचे पदाधिकारी होते.
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून भारतीय वंशाचे अहमद खान यांची नियुक्ती झाली का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya Khadse
Result: False