दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल तस्करीचा जुना व्हिडिओ व्हायरल? वाचा सत्य

False सामाजिक

तुपाच्या डब्यातून पिस्तुलांची तस्करी करण्याचा एक व्हिडियो शेयर करून दिल्लीमध्ये मुस्लिम नागरिक अशाप्रकारे हत्यारे आणत असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडियो शेयर होत असल्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडियोवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळमी केल्यावर कळाले की, या व्हिडियोचा दिल्ली दंगलीशी काहीच संबंध नाही.

काय आहे दावा?

तुपाच्या डब्यात लपून ठेवलेले पिस्तुल बाहेर काढतानाचा व्हिडियो शेयर करून युजर्स म्हणत आहेत की, ‘मुल्ले बघा दिल्लीत हत्यारे कशी आणत होते??? दिल्ली पोलीस अभिनंदन व आभार’

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकArchive

तथ्य पडताळणी  

दिल्ली दंगलीसंबंधी करण्यात आलेले अनेक खोटे व्हिडियो फॅक्ट क्रेसेंडोने समोर आणले आहेत. त्यामुळे या व्हिडियोचे सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. 

सर्वप्रथम व्हिडियोतील की-फ्रेम्स गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्या. त्यातून कळाले की, हा व्हिडियो तर जूना आहे. 

आज तक वाहिनीच्या मध्यप्रदेश स्थानिक चॅनेलवरील रोजीच्या बातमीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने तुपाच्या डब्ब्यातून पिस्तूल नेत असताना दोन तरुणांना अटक केली होती. ही घटना 23 सप्टेंबर 2019 रोजी म्हणजेच दिल्ली दंगलीच्या अगोदर घडलेली आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूर या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

द हिंदूने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार कारमधून हे कॅन जप्त करण्यात आले होते. यात 26 पिस्तूले सापडली. पोलीस उपायुक्त प्रमोदसिंह खुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र उर्फ जितू (वय 25, रा. मध्य प्रदेश) आणि राज बहादुर (वय. 30 रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. ते दिल्लीसह वेगवेगळ्या शहरांमध्ये ही पिस्तूले विकत होते. 

image5.png

द हिंदूने दिलेले सविस्तर वृत्त / Archive

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ दिल्ली दंगलीच्या आधी पाच महिन्यांपूर्वीचा आहे. तसेच यामध्ये पकडण्यात आलेले आरोपीदेखील मुस्लिम नव्हते. दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडियो चुकीच्या दाव्यासह शेयर केला जात आहे. 

Avatar

Title:दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल तस्करीचा जुना व्हिडिओ व्हायरल? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False