कोरोना व्हायरस : इंडोनेशियातील मटण मार्केटचा व्हिडिओ चीनमधील म्हणून व्हायरल

Coronavirus False आंतरराष्ट्रीय | International वैद्यकीय

केरळमध्ये एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. त्यातच समाजमाध्यमात याबाबत वेगवेगळी माहिती पसरत आहे.

चीनमधील मटण मार्केटचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. योगेश पाखरे, संजीव कोळकुंभे, शैलेश पाटील आदींनी अशा माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरंच चीनमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

या व्हिडिओच्या सुरूवातीलाच ‘ Pasar Extream Langowan’ असे इंग्रजीत लिहिले असल्याचे दिसून आले. आम्ही हा शब्दप्रयोग करत युटुयूबवर शोध घेतला असता आम्हाला खालील व्हिडिओ दिसून आला.

Archive

आम्ही हाच शब्दप्रयोग करत आणखी शोध घेतला असता हे ठिकाण इंडोनेशियात असल्याचे दिसून आले.

image1.png

या व्हिडिओतच 20 ते 21 व्या सेकंदाला एक इमारत दिसते. या इमारतीवर इंडोनेशियन भाषेत लिहिलेला फलक आहे. त्याचे मराठीत भाषांतर केल्यावर मिनाहास रीजेंसी, व्यापार विभाग, लंगोवन मार्केट ऑफिस असे लिहिले असल्याचे दिसून आले. याबाबत शोध घेतल्यावर लांगोवन हे इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रदेशातील एक ठिकाण असल्याचे दिसून आले आणि येथील बहुसंख्य लोकसंख्या मिनाहसन वांशिक आहे.

image3.png

आम्हाला गेटी इमेजेसवरही याची खूप छायाचित्रे दिसून आली. यातील अनेक छायाचित्रे ही व्हिडिओतील दृश्यांशी मिळतीजुळती असल्याचे आपल्या लक्षात येते. यातून हे सिध्द होत आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियातील आहे. गेटी इमेजवरील छायाचित्र आणि व्हिडिओतील एका दृश्याची आम्ही केलेली तुलना आपण खाली पाहू शकता. 

Thubnail-Post.png

निष्कर्ष

हा व्हिडिओ इंडोनेशियातील आहे. कोरोना व्हायरसशी संबंध जोडत हा व्हिडिओ चीनमधील असल्याचा करण्यात येत असलेला दावा असत्य आहे.

Avatar

Title:कोरोना व्हायरस : इंडोनेशियातील मटण मार्केटचा व्हिडिओ चीनमधील म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False