भारत-चीन संघर्षामध्ये जखमी झालेल्या सैनिकाचा म्हणून जुनाच फोटो व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

गेल्या आठवड्यात भारत-चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये खिळे लावलेल्या रॉडने हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो जखमांनी भरलेल्या एका व्यक्तीचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, तो चीनच्याच्या हल्ल्यात जखमी झालेला भारतीय सैनिक आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा फोटो 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

पाठ सोलून निघालेल्या एका व्यक्तीचा फोटो शेयर करून म्हटले की, “पुढच्या वेळी चिनी बनावटीचे सामान खरेदी करताना चीनने गलवान खोऱ्यात खिळे लावलेल्या दांड्याने मारलेल्या आपल्या या सैनिकाला डोळ्यासमोर आणा.”

sfwefsfdsds.png

मूळ फोटो – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील फोटो रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

भारत आणि चीनच्या लष्करामध्ये 15 जून रोजी रात्री संघर्ष झाला होता. म्हणजे हा फोटो त्यापूर्वीपासून उपलब्ध आहे.

sfedfsd.png

हा फोटो इंडोनेशिया, व्हिएत्नाम, मलेशिया येथील विविध वेबसाईट्सवर वापरल्याचे आढळले. हा फोटो नेमका कशाचा आहे जरी समजू शकले नसले तरी तो सैन्यप्रशिक्षणाविषयीच्या लेखांमध्ये वापरलेला आहे. सैनिकांना किती कठोर आणि खडतर प्रशिक्षणातून जावे लागते हे दर्शवण्यासाठी हा फोटो उदाहरणाखातर वापरला जातो.

अशाच एका ब्लॉगपोस्टमध्ये तो 22 मे 2016 रोजी वापरण्यात आल्याचे दिसते. खाली दिलेला स्क्रीनशॉट पाहावा.

screenshot-blogmazeer.blogspot.com-2020.06.22-16_15_51.png

मूळ ब्लॉग येथे पाहा – ब्लॉग मझीरअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, जुना आणि असंबंधित फोटो भारतीय जवानाच्य नावे व्हायरल होत आहे. सदरील व्हायरल फोटो भारत-चीन संघर्षमध्ये जखमी झालेल्या भारतीय सैनिकाचा नाही. हा फोटो 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

Avatar

Title:भारत-चीन संघर्षामध्ये जखमी झालेल्या सैनिकाचा म्हणून जुनाच फोटो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •