
सध्या सोशल मीडियावर निवडणूकींच्या अनुषंगाने वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतांना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक बाबा बेधुंद होवून नाचत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये नाचणाऱ्या बाबांचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओ संदर्भात हे बघा भाजपचे सोलापूरचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी,
शिव तांडव करून सोलापूरच्या विकासाचा आराखडा काढताना असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत फेसबुकच्या पुजा शिंदे या अकाउंटवरुन हा व्हिडिओ 309 वेळा शेअर, 306 वेळा लाईक्स आणि 100 कमेंटस् करण्यात आल्या आहेत.
सत्य पडताळणी
व्हायरल व्हिडिओ फेसबुकवर खाली दिलेल्या इतर पेजवरही व्हायरल होत आहे.
या व्हिडिओची रिव्हर्स इमेज केल्यानंतर खालील रिझल्ट समोर आले.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील बाबाच्या नावाबद्दल दोन मतप्रवाह आढळले. झी न्युज चॅनलवर करण्यात आलेल्या बातमीत या नाचणाऱ्या बाबाचे नाव भांगडा बाबा (‘Bhangra Baba’) असे आले आहे. तर मोहम्मद शरीफ डी या व्यक्तीने व्हायरल केलेल्या या व्हिडिओतील कमेंटमध्ये भांडा बाबा असे म्हटले आहे.
व्हायरल होणारा व्हिडिओ युट्युबवर 1 ऑगस्ट 2013 रोजी मोहम्मद शरीफ डी या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या युटुब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नाचणारा बाबा हा ओडिशातील आहे हे आढळले आहे.
त्यानंतर हा व्हिडिओ महेंद्र सिंग उदावंत या व्यक्तीच्या युट्युब चॅनलवर 26 जानेवारी 2014 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.
फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील नाचणारी व्यक्ती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासारखी साधर्म्य असणारी दुसरी व्यक्ती आहे. यासंदर्भातच झी न्युजवर एक बातमी 9 ऑगस्ट 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता. झी न्युज या चॅनलवर स्क्रीन शॉट मध्ये युट्युबमध्ये हा व्हिडिओ उपलब्ध आहे असे दिसत आहे. परंतू 25 मार्च 2019 पासून युट्युबमध्ये हा व्हिडिओ प्रत्यक्षपणे उपलब्ध होत नाही.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ संदर्भात सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा उल्लेख आला आहे.
कोण आहेत नेमके डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी?
डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत. त्यांनी संत साहित्य आणि धर्म या विषयावर अनेक प्रबोधनपर प्रवचन दिले आहेत. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी धर्मशास्त्रात पीएचडी केली आहे. त्यांना कन्नड, मराठी, तेलगु, हिंदी, इंग्रजी भाषा येतात. भारतीय जनता पार्टीकडून त्यांना 2019 साठी सोलापूर राखीव मतदार संघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात जयसिध्देश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या राजकीय उमेदवारी विषयावर जय महाराष्ट्र या वेब पोर्टलवर सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली आहे.
खरे जयसिद्धेश्वर स्वामी आणि कथित व्हायरल व्हिडिओतील जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यातील फरक आपण खाली बघू शकता.
फोटोतील चेहऱ्याबद्दल अधिक बारकाईने संशोधन केल्यानंतर असे आढळून आले आहे की, डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी आणि भांडा बाबा यांच्या चेहऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे साम्य नाही. दोन्हीही व्यक्ती या वेगवेगळ्या आहेत. दोन्ही चेहऱ्यामधील फरक ओळखण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने ऑनलाईन फेशिअल रिकग्नेशन वेबसाईट बेटाफेस द्वारे फेशिअल अनॅलिसेस केले आहे.
संपुर्ण तथ्यांचा अभ्यास केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओतील नाचणारी व्यक्ती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे नाहीत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नाचणारी व्यक्ती डॉ. जयसिद्धेश्वर यांच्यासारखी साधर्म्य असणारी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचे नाव भांडा बाबा म्हणून प्रचलित आहे. यासंदर्भात आपलं महानगर आणि या वेब पोर्टलवर आणि दैनिक लोकमत येथेही या विषयावर बातमी प्रसिद्ध झाली आहे.
निष्कर्ष : फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हे बघा भाजपचे सोलापूरते उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी, शिव तांडव करुन सोलापूरच्या विकासाचा आराखडा काढताना असे म्हटले आहे. परंतू व्हिडिओमध्ये नाचणारी व्यक्ती ही डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी नाहीत. व्हायरल व्हिडिओ हा ऑगस्ट 2013 या वर्षीचा आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओसंदर्भात करण्यात आलेला बघा भाजपचे सोलापूरते उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी, शिव तांडव करुन सोलापूरच्या विकासाचा आराखडा काढताना खोटा आहे.

Title:व्हिडिओमध्ये नाचणारे बाबा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आहेत का? : सत्य पडताळणी
Fact Check By: Amruta KaleResult: False
