तथ्य पडताळणीः एबीपी माझाच्या पोलनुसार वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत 27 जागा मिळणार?

False राजकीय

लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाचा लागलेली आहे. वृत्तवाहिन्या विविध सर्व्हे आणि पोलच्या माध्यमातून कोणता पक्ष किती जागा पटकावणार याचा अंदाज बांधतात. अशाच एका पोलमध्ये एबीपी माझा या चॅनेलने यंदा लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात 48 पैकी 27 जागा मिळतील, असे म्हटल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये एबीपी माझाच्या ओपिनियन पोल-2019 नुसार यंदा एनडीएला 12, यूपीएला 6, वंचित बहुजन आघाढीला 27 तर इतर/अपक्षांना 3 जागा मिळतील. युजरने हा फोटो शेयर करताना सोबत लिहिले की, करा व्हायरल कमीत कमी हजार शेअर झाले पाहिजेत. किंवा कॉपी पेस्ट झाले पाहिजेत. काहीही करा पण व्हायरल करा. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली आहे.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोचे निरीक्षण केल्यावर लक्षात येते की, हा पोल 27 मार्च 2019 रोजी एबीपी माझा चॅनेलवर दाखवलेला असावा. म्हणून आम्ही एबीपी माझा वाहिन्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली.

तेथे 27 मार्च 2019 रोजी प्रसारित करण्यात आलेल्या बातमीचा एक व्हिडियो आढळला. त्याचे नाव -असा असू शकतो महाराष्ट्रातील 48 जागांचा निकाल  – असे आहे. कौल मराठी मनाचा या कार्यक्रमाच्या 68 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये 45 सेंकदाला सर्वपक्षांना किती जागा मिळतील याचा अंदाज दिलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही खाली पाहू शकता

मूळ वेबसाईटवर हा व्हिडियो पाहा – एबीपी माझाअर्काइव्ह

वर दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये एनडीएला 37, यूपीएला 11 तर वंचित बहुजन आघाडीला शुन्य जागा मिळतील असे दिले आहे. म्हणजे फेसबुक पोस्टमधील पोलचा फोटो एडिट केलेला आहे. दोघांची तुलना करून पाहू.

या कार्यक्रमाचा व्हिडियो एबीपी माझाच्या यूट्युब चॅनेलवरसुद्धा उपलब्ध आहे. तो खाली पाहा.

निष्कर्ष

फेसबुक पोस्टमध्ये एबीपी माझाचा म्हणून दिलेला पोल फोटोशॉप करून एटिड केलेला आहे. एबीपी माझाच्या मूळ पोलमध्ये वंचित बहुजन आघाडीला शुन्य जागा मिळतील असे भाकित करण्यात आले आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः एबीपी माझाच्या पोलनुसार वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत 27 जागा मिळणार?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False