शेहला रशीद यांच्या नावे ‘शकिरा’ चित्रपटाला विरोध करणारे फेक ट्विट व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय

जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद हिच्या नावे एक फेक ट्विट शेयर होत आहे. काश्मीरी पंडितांवर आधारित ‘शिकारा’ चित्रपटाला तिने मुस्लिमविरोधी म्हणत त्यावर बंद घालण्याची मागणी केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला.

काय आहे पोस्टमध्ये?

शेहला रशीदचे नाव असणाऱ्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्टमध्ये दिलेला आहे. ट्विटमध्ये म्हटले की, शकिरा चित्रपट हा काश्मीरमधील मुस्लिमांच्या विरोधातील आहे. त्यामुळे त्यावर बंदी घातली पाहिजे. भूतकाळाला उगळण्यात काही अर्थ नाही. जे झालं ते होऊन गेलं. (मराठी भाषांतर)

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम शेहला रशिदने असे काही ट्विट केले याची माहिती घेतली. शेहला हे कायम न्यूजमध्ये राहणारे नाव आहे. तिचे ट्विट आणि वक्तव्य ‘न्यूज’ बनते. त्यामुळे जर तिने असे काही वादग्रस्त ट्विट केले असेल तर त्याची सनसनाटी बातमी बनली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी इंटरनेटवर आढळली नाही.

तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरदेखील असे कोणतेही ट्विट आढळले नाही. याचा अर्थ की, एक तर तिने ते डिलीट केले असेल किंवा हा स्क्रीनशॉट फेक आहे.

शेहलाच्या अकाउंटवर उपलब्ध असणाऱ्या एका ट्विटची फॅक्ट क्रेसेंडोने व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटशी तुलना केली. त्यातून दोन्हींमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या.

मूळ ट्विट येथे पाहा – ट्विटर 

1. पोस्टमधील स्क्रीनशॉटमध्ये शेहलाचे नाव आणि ट्विटचा मजकूर यामधील अंतर आणि तिच्या खऱ्या ट्विटमधील अंतर यात खूप फरक आहे.

2. पोस्टमधील स्क्रीनशॉटमध्ये ट्विटचा वेळ किंवा तारीख दिलेली नाही. सोयीने ते देण्याचे टाळण्यात आलेली आहे.

खुद्ध शेहलानेसुद्धा असे तिने ट्विट न केल्याचे फॅक्ट-चेक शेयर करून खुलासा केला आहे. ऑल्ट न्यूज आणि क्विंटनेदेखील हे ट्विट फेक असल्याचे फॅक्ट-चेक केले आहे.

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, सदरील फोटो ओरिजनल ट्विटचा स्क्रीनशॉट नाही. तो फोटोशॉपद्वारे तयार करून केवळ भ्रमित करण्यासाठी पसरविण्यात येते आहे. शेहला रशीदच्या नावे ‘शकिरा’ चित्रपटाला विरोध करणारे फेक ट्विट व्हायरल होत आहे.

Avatar

Title:शेहला रशीद यांच्या नावे ‘शकिरा’ चित्रपटाला विरोध करणारे फेक ट्विट व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False