दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास आता चांगलाच वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना 700 रुपये वाटत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. अयान एस. के. यांनीही हा व्हिडिओ अशाच दाव्यासह पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

दिल्लीत भाजप मतदारांना घरोघरी जाऊन 700 रुपये वाटत असल्याचा हा व्हिडिओ खरा आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी आम्हाला एका ठिकाणी या महिलेच्या हातात असलेल्या कागदावर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ आणि कौशल्या देवी बंसल हे नाव दिसून आले.

image1.jpg

त्यानंतर आम्ही कौशल्या देवी बन्सल असा शब्दप्रयोग करत शोध घेतला असता आम्हाला दैनिक भास्करच्या संकेतस्थळावरील 22 डिसेंबर 2019 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार हा व्हिडिओ छत्तीसगड राज्यातील महासमुंद येथील पालिकेच्या निवडणुकीच्यावेळी व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या महिला या भाजपच्या वॉर्ड क्रमांक 19 मधील उमेदवार कौशिल्या देवी बन्सल आणि त्यांच्या नात्यातील भगिनी लिलिता अग्रवाल या आहेत. निवडणूकीच्या अगोदरच्या रात्री हा व्हिडिओ व्हायरल झाला. कौशिल्या बन्सल आणि ललिता अग्रवाल यांनी हा व्हिडिओ फेक असल्याचे आणि यातील आवाज बदल करण्यात आल्याचे म्हटले आहे. या लिलाफ्यात पैसे नव्हे तर मतदार स्लीप होती असा दावाही त्यांनी केला आहे.

image3.png

Archive

याव्यतिरिक्त राष्ट्रबोध (संग्रहण) या संकेतस्थळावरही आम्हाला याबाबतचे वृत्त दिसून आले. यातून हे स्पष्ट झाले की, ही घटना दिल्लीत नव्हे तर छत्तीसगडमधील महासमुंद येथे घडली होती.

निष्कर्ष

दिल्लीत भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा हा व्हिडिओ नाही. छत्तीसगडमधील महासमुंद येथील घटनेचा हा व्हिडिओ आहे. याचा दिल्लीतील निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. 

Avatar

Title:दिल्लीत भाजप मतदारांना घरोघरी जाऊन 700 रुपये वाटत आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False