केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींचा मृत्यू होतो का? वाचा सत्य

False सामाजिक

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला अमानुषपणे मारण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये सध्या हत्तींविषयी वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या करण्यात येते, असा एक दावाही समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. केरळमध्ये दरवर्षी खरोखरच 600 हत्तींची हत्या करण्यात येते का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Elephant.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या करण्यात येते का, हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय याबाबत काय म्हणते याचा शोध घेतला. त्यावेळी लोकसभा या संकेतस्थळावर खासदार गजानन किर्तीकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर पर्यावरण मंत्रालयाने दिलेले उत्तर दिसून आले. या उत्तरात 2015-16 ते 2018-19 या कालावधीत देशभरात वेगवेगळ्या अनैसर्गिक कारणांनी 373 हत्तींचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 

Loksabha imag.png

लोकसभा / संग्रहित

त्यानंतर केरळच्या वनविभागाने याबाबत 8 जून 2020 रोजी खुलासा करत मागील दहा वर्षात राज्यात नैसर्गिक कारणाने 772 हत्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. अनैसर्गिक कारणाने 64 हत्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.  समाजमाध्यमात पसरत असलेली माहिती चुकीचे असल्याचे ट्विट वनविभागाने केले असल्याचे आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

भारतात सध्या 27 हजार 312 हत्ती असल्याचे पर्यावरण मंत्रालयाने 2017 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. रानडुक्करांना मारण्यासाठी केवळ बंदूक वापरण्यास परवानगी (संग्रहित) दिल्याचेही केरळ सरकारने म्हटले आहे. या माहितीतून हे स्पष्ट झाले की, केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या होते, ही माहिती असत्य आहे. 

निष्कर्ष

केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींची हत्या होते, ही माहिती असत्य आहे.

Avatar

Title:केरळमध्ये दरवर्षी 600 हत्तींचा मृत्यू होतो का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False