FACT CHECK – चार्जिंगला लावून मोबाईलवर बोलल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला का?

False सामाजिक

शरीरापासून डोकं वेगळं झालेल्या मुलाचा रक्तबंबाळ फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य सिद्ध झाला. पाकिस्तानात काकांनी पुतण्याची केलेल्या हत्येचा हा फोटो आहे.

काय आहे दावा?

बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात धडापासून शीर वेगळे झालेल्या मुलाचा फोटो शेयर करून म्हटले की, “चार्जिंगला मोबाईल लावून बोलू नका.” हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल होत असलेल्या मेसेजमधील रक्तरंजीत फोटोचे निरीक्षण केल्यावर दिसते की, या मुलाचे शीर चिरलेले आहे. स्फोटामुळे ते वेगळे झाले असते तर जळाले असते. परंतु, तसे काहीच या फोटोत नाही.

मग फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. विविध लिंकची तपासणी केल्यावर पाकिस्तानातील एका फेसबुक पेजवर 14 जून 2018 रोजी हा फोटो शेयर केल्याचे आढळले. 

फोटोच्या कॅप्शननुसार, पाकिस्तानच्या अपर दिर भागात काकाने त्याच्या 7 वर्षांच्या पुतण्याची निघृण हत्या केली होती. 

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक शोध घेतला. डॉक्युमेटिंग रिएलिटी वेबसाईटवरील 14 जून 2018 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळली. या बातमीच या निघृण हत्येचे अनेक फोटो दिलेले आहेत. 

सोबतच्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानच्या खायबर पख्तुनखाँ भागातील आहे. 2018 मधील रमजानच्या महिन्यात इकबाल नावाच्या इसमाने त्याच्या सात वर्षीय पुतण्या सदिसची गळा कापून हत्या केली होती. 

मूळ बातमी येथे वाचा – डॉक्युमेटिंग रिएलिटीअर्काइव्ह

पाकिस्तानमधील इतर वेबसाईट्सनेदेखील या घटनेच्या बातमी दिलेल्या आहेत. ‘टीएनएस वर्ल्ड’ने माहिती दिली की, हत्या झालेला मुलगा अनाथ होता. त्याच्या काकांनी हे कूकर्म का केले, यामागचा हेतू काय हे स्पष्ट झाले नव्हते.

ऑक्टोबर 2018 मधील एका फेसबुक पोस्टनुसार, अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी काकाला मृत्यूदंडाची शिक्षा व 10 लाख रुपये दंड सुनावला.

मग मोबाईल चार्जिंगला लावून बोलण्यात काही धोका आहे का?

मोबाईल चार्जिंगला लावून बोलू नये असे सांगितले जरी असले तरी तसे करण्यात काही धोका नाही. असे केल्याने मोबाईलचा स्फोटो होण्याची शक्यता अनेक तज्ञांनी फेटाळली आहे. लाईफवायर वेबसाईटनुसार, मोबाईल कंपनीच्या अधिकृत चार्जरचाच वापर करीत असाल तर चार्जिंगला लावून बोलण्यात किंवा वापरण्यात काहीच धोका नाही. 

डीजीनेट वेबसाईटनेवरील तज्ज्ञांनीसुद्धा चार्जिंगला लावून मोबाईल वापरण्यात काहीच धोका नसल्याचे सांगितले.

मूळ बातमी येथे वाचा – लाईफवायर

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानातील एका लहान मुलाच्या मृतदेहाचा फोटो चुकीच्या दाव्यासह शेयर केला जात आहे. 2018 साली अपर दिर भागात काकानेच त्याच्या सात वर्षीय पुतण्याची हत्या केली होती. त्या मृत मुलाचा हा फोटो आहे. तसेच तज्ज्ञांनीसुद्धा चार्जिंगला लावून मोबाईल वापरण्यात काहीच धोका नसल्याचे सांगितले.

Avatar

Title:चार्जिंगला लावून मोबाईलवर बोलल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False