चाकात लपविलेल्या दोन हजाराच्या नोटा जप्त केल्याचा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

False Social

दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर होताच सोशल मीडियावर याविषयी विविध व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. अशाच एका क्लिपमध्येमध्ये चाकामध्ये लपविलेल्या दोन हजाराच्या नोटा काढत असल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, आरबीआयच्या निर्णयानंतर लोक असा काळा पैसा बाहेर काढत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा दोन हजाराच्या नोटेला वितरणातून मागे घेण्याच्या निर्णयाशी संबंध नाही. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चाकामधून दोन हजार रुपयांचे बंडल काढून टेबलवर ठेवत आहे. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मोदीजींनी दोन हजाराची नोट बंदी यामुळेच केली आहे; आता अनेक चोर लुटारू बाहेर येतील ही तर सुरुवात आहे.” 

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओसंबंधित कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ पाच वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. 

हा व्हिडिओ एच.डब्लू इंग्लिश न्यूज युट्युब चॅनलवर 21 एप्रिल 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता.

आयकर विभागाने कर्नाटकातील शिवमोगा येथे जाणाऱ्या कारच्या स्पेअर टायरमधून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. कर्नाटकच्या राजधानीतून शिवमोगाला पैसे नेत असल्याची गुप्त माहिती आयकर विभागाला मिळाली होती.

एडीटीव्हीच्या बातमीनुसार “देशभरातून रोख जप्तीच्या विविध घटनांची नोंद होत असताना, आयकर विभागाने बेंगळुरू ते कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जाणाऱ्या कारच्या स्पेअर टायरमधून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.

एएनआयने 20 एप्रिल 2019 रोजी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. सदरील माहितीनुसार कर्नाटकमधील आयकर विभागाने लोकसभा निवडणुकीदरम्यान पैसे जप्त केले होते.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, या व्हिडिओचा चलनातून मागे घेण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांशी काही संबंध नाही. हा व्हिडिओ 2019 मध्ये कर्नाटकमधील आयकर विभागाने शिवमोगामध्ये जप्त केलेल्या पैशांचा आहे. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चाकात लपविलेल्या दोन हजाराच्या नोटा जप्त केल्याचा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply