कन्नूर विमानतळावर पॉवर बॅंकने मोबाईल चार्ज करताना स्फोट झाला का? वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

केरळमधील कन्नूर विमानतळावर पॉवर बॅंकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत असताना फोनचा स्फोट झाल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. आपण सर्वजन बँगेत अथवा खिशात फोन ठेऊन तो चार्ज करत असतो. अशा सर्वांना हा व्हिडिओ म्हणजे एक इशारा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. 

कृपया उष्णता बाहेर पडू शकणार नाही, अशा ठिकाणी चार्जिग करणे टाळा, असे आवाहनही या व्हिडिओसोबत करण्यात आले आहे. ही घटना नेमकी केरळमधील कन्नूर विमानतळावर घडली का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive   

तथ्य पडताळणी

केरळमधील कन्नूर विमानतळावर फोनचा स्फोट झाला असेल तर हे वृत्त प्रसारमाध्यमांनी नक्कीच दिले असेल. परंतु, याबाबतचे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे वृत्त आढळले नाही. या व्हिडिओचे नीट निरीक्षण केले असता एक चिन्ह दिसते. 

image5.png

हे चिन्ह केरळमधील कन्नूर विमानतळाचे आहे का, हे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. विकीपीडियावर असलेल्या माहितीत आम्हाला कन्नूर विमानतळाचा लोगो दिलेला आहे. हे चिन्ह व्हिडिओत दिसणाऱ्या चिन्हापेक्षा बरेच वेगळे आहे. 

image9.png

हा व्हिडिओ केरळमधील कन्नूर विमानतळावरील नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले होते. त्यामुळे आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यानंतर मोरक्को वर्ल्ड न्यूजने 11 जून 2018 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तासोबत एक व्हिडिओ देखील होता. ही घटना मोरोक्को येथील Marjane मॉलमध्ये घडल्याचे या वृत्तात म्हटले होते. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ही व्यक्ती चोर असून 3 जून 2018 रोजी तिला पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याने आत्मदहनाचा हा प्रयत्न केला. म़ॉलच्या कर्मचाऱ्यांना या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

image8.png

Archive

त्यानंतर आम्ही Marjane मॉलच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी आम्हाला व्हिडिओत दिसणारे चिन्ह देखील दिसून आले. यातूनही हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ केरळमधील नसून मोरक्को येथील आहे. 

image10.png

आम्ही Marjane मॉलच्या संकेतस्थळावरील चिन्हाची आणि व्हिडिओतील चिन्हाची तुलना केली असून आपण ती खाली पाहू शकतो. फॅक्ट क्रेसेंडोने हिंदी भाषेतही याचे फॅक्ट चेक केलेले आहे. 

निष्कर्ष 

केरळमधील कन्नूर विमानतळावर पॉवर बॅंकच्या सहाय्याने मोबाईल फोन चार्ज करत असताना फोनचा स्फोट झाल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. हा व्हिडिओ मोरक्को येथे एका व्यक्तीने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नाचा आहे. 

Avatar

Title:कन्नूर विमानतळावर पॉवर बॅंकने मोबाईल चार्ज करताना स्फोट झाला का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •