सोनिया गांधी यांच्याकडे ‘भारताला ख्रिश्चन राष्ट्र’ करण्याचे पुस्तक दाखवणारा तो फोटो फेक; वाचा सत्य

False राजकीय | Political

सोनिया गांधी यांचा असा फोटो शेयर केला जात आहे ज्यामध्ये त्यांच्यामागील कपाटात येशू ख्रिस्तांची मूर्ती, बायबल आणि भारताला ख्रिश्चन राष्ट्र कसे करायचे (How to convert India into Christian Nation) अशी पुस्तक दिसते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा फोटो बनावट आहे. मूळ फोटोशी छेडछाड करून त्यामध्ये ख्रिश्चन धर्माविषयक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत.

तथ्य पडताळणी

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले, की हा फोटो सोनिया गांधी यांनी 20 ऑक्टोबर 2020 रोजी बिहारच्या जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाच्या व्हिडिओतून घेण्यात आलेला आहे. 

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरून हा सोनिया गांधी यांचा हा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला होता. हाच व्हिडिओ राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील उपलब्ध आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते, की सोनिया गांधी यांच्यामागील कपाटामध्ये बायबल, येशू ख्रिस्तांची मूर्ती आणि भारताला ख्रिश्चन राष्ट्र कसे करण्याचे पुस्तक नाही.

फोटोशॉपद्वारे मूळ फोटोशी छेडछाड करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या तुलनेत हा बदल लगेच लक्षात येतो.

निष्कर्ष

सोनिया गांधी यांच्या फोटोला एडिट करून त्यांच्या मागील पुस्तकांच्या कपाटात येशू ख्रिस्तांची मूर्ती, बायबल आणि भारताला ख्रिश्चन राष्ट्र कसे करायचे अशी पुस्तके दाखविण्यात आली आहेत. अशा या बनावट फोटोच्या माध्यमातून असत्य माहिती पसरविली जात आहे. मूळ फोटोत सोनिया गांधी यांच्या पाठीमागे या तीनही गोष्टी नाहीत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सोनिया गांधी यांच्याकडे ‘भारताला ख्रिश्चन राष्ट्र’ करण्याचे पुस्तक दाखवणारा तो फोटो फेक; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False