भारतीय तुरुंगातून मसूद अझहरला भाजपने सोडले का ? : सत्य पडताळणी

Mixture आंतरराष्ट्रीय

(संग्रहित छायाचित्र)

सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंच्या बाबतीत मसूद अझहरला भाजपने भारतीय तुरुंगातून सोडवले असा दावा करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने यासंदर्भात केली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये तीन फोटो दाखविण्यात आले असून, पहिल्या फोटोमध्ये भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मसूद अझहर याला घेवून जातानाचा व्हिडिओ आहे. दुसरा फोटो तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग हे मसूद अझहर यांच्यासोबत उभे असताना दिसत आहेत. या तीनही फोटोच्या बाबतीत मसूद अझहर हे भाजपच पाप आहे. मसूद भारताच्या तुरुंगात होता त्याला भाजपवालेच विमानात सोडून आले होते, असे लिहिलेले आहे.

सत्य पडताळणी

ही घटना आहे 1999 मधील. 24 डिसेंबर 1999 ला भारताचे विमान आयसी 814 याचे अपहरण करण्यात आले होते. पोस्टमध्ये देण्यात आलेल्या तीनही फोटोंना गुगल रिव्हर्स इमेज केल्यानंतर खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.

INDIA TODAY l अर्काईव्ह

24 डिसेंबर 1999 रोजी सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केवळ सरकारतर्फे मध्यस्थी बोलणी करण्याच्या कामामध्ये सहभाग घेतला होता. पोस्टमध्ये देण्यात आलेल्या फोटोमध्ये मसूद अझहर नसून, तालिबानचा प्रतिनिधी आणि अजित डोवाल यांचा हा फोटो आहे. पहिल्या फोटोसंदर्भात अजित डोवाल हे केवळ मध्यस्थी करुन वाटाघाटी – बातचीत करण्याच्या कामात होते. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता. कारण या विमानात एकूण 155 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांचा जीव वाचावा या हेतूने सर्व मध्यस्थी करण्याचे काम भारत सरकारतर्फे सुरु होते.

ABP LIVE l अर्काईव्ह

पोस्टमध्ये दुसरा आणि तिसरा फोटो हा तत्कालिन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग हे स्वतः कंदहार येथे तीन अतिरेक्यांना तालिबानींच्या हवाली करण्यासाठी जात असतानाचा फोटो आहे. या विषयी खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.

Daily O l अर्काईव्ह

कंदहार विमान अपहरण प्रकरणी तत्कालिन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग हे स्वतः तीन अतिरेक्यांना तालिबानींच्या हवाली करण्यासाठी जात असताना प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीच्या वेळी पोस्टमधील दुसरा आणि तिसरा फोटो घेण्यात आलेला आहे.

या संदर्भातील तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीचा व्हिडिओ  एपी या वृत्तसंस्थेच्या युट्युब चॅनलवर 21 जुलै 2015 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. तसेच हाच व्हिडिओ एपी अर्काईव्ह या युट्युब चॅनलवरसुद्धा अपलोड करण्यात आलेला आहे.

1999 या वर्षी झालेल्या विमान अपहरणाच्या सविस्तर संपुर्ण माहितीचा व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर आपण पाहू शकता. युट्युबवर एनडीटीव्ही चॅनलवर हा व्हिडिओ आपण पाहू शकता.

हे सर्व घटना-घडामोडी घडत असताना, तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत सरकार या नात्याने कोणताही निर्णय घेण्याच्याआधी एक सर्वपक्षीय बैठक घेतली होती. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील उपस्थित होते. तसेच तत्कालिन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका प्रतिक्रियेत कंदहार विमान अपरहण आणि निर्णय याविषयी भारत सरकारचा निर्णय हा राष्ट्रीय निर्णय होता. हा निर्णय कोणत्याही एका पक्षाने घेतलेला निर्णय नव्हता.

Money control l अर्काईव्ह

TIMES OF INDIA l अर्काईव्ह

तत्कालिन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे. इंडियन एक्सप्रेस ऑनलाईन या युट्युब चॅनलवर आपण जसवंत सिंग यांची प्रतिक्रिया पाहू शकता.

सर्वपक्षीय बैठक विषयी भाजप नेते एम. जे. अकबर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आपण येथे बघू शकता.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये देण्यात आलेले तीनही फोटो हे 1999 वर्षी झालेल्या भारतीय विमान अपहरणातील संपुर्ण कायदेशीर आणि सरकारी प्रक्रियेतील आहेत. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मसुद अझहर आणि इतर दोन अतिरेक्यांना भारतीय तुरुंगातून सोडविण्यापुर्वी एक सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला भारतीय तुरुंगातून मसुद अझहरला भाजपने सोडले हा दावा संमिश्र स्वरुपाचा आहे.  

Avatar

Title:भारतीय तुरुंगातून मसूद अझहरला भाजपने सोडले का ? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture