
नेहरू इस देशकी दुर्दशाके जिम्मेदार-अमित शाह हमें नेहरूके सपनोंका भारत बनाना है-नरेंद्र मोदी ठीक है,आपसमें तय करलो की करना क्या है! अशी एक पोस्ट रफीक शेख यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने अमित शाह यांनी असे वक्तव्य केले आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
नेहरू इस देशकी दुर्दशाके जिम्मेदार, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे का याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही शोध घेतला तेव्हा त्यांनी संसदेत केलेले 28 जून 2019 चे भाषण आम्हाला दिसून आले. या भाषणात त्यांनी नेहरूंवर केलेली टीका दिसून येते. यात त्यांनी जम्मू-काश्मीरचा संयुक्त राष्ट्रसंघात नेल्याबद्दल नेहरूंना जबाबदार धरले आहे. Republic World चा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
एनडीटीव्हीने 28 जून 2019 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तातही अमित शाह यांनी काश्मीरच्या मुदद्यावर नेहरू जबाबदार म्हटले आहे.
एनडीटीव्हीनेच 4 एप्रिल 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या एका वृत्तानुसारही अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या समस्येसाठी नेहरूंना जबाबदार धरले आहे.
महाराष्ट्र टाईम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंनी दाखवलेल्या कर्तव्याच्या मार्गावर चालण्याचा निर्धार व्यक्त करणारे वृत्त दिल्याचे दिसून येते.
निष्कर्ष
अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर नेहरूंना जबाबदार धरले आहे. त्यांनी देशाच्या दुर्दशेसाठी नेहरू जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्याचे दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र नेहरूंनी दाखवलेल्या कर्तव्याच्या मार्गावर चालण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची असल्याचे दिसून येते.

Title:Fact Check : अमित शाह म्हणाले का, नेहरू देशाच्या दुर्दशेसाठी जबाबदार
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Mixture
