
दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बाब आहे. दिल्लीतील यमुना नदीचे प्रदूषण देखील नेहमीच चर्चेत असते. दिल्लीतील यमुना नदीच्या सध्याच्या प्रदूषणाचे म्हणून काही फोटो समाजमाध्यमात फिरत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्स नदीतील फेसामध्ये पूजा करीत असलेल्या महिलांचे फोटो शेयर करीत आहेत. सोबत लिहिले की, ‘दिल्लीचे गँस चेंबर बनलेय आणि नदीची हालत तर दिसतेयच….नदी या फेसाळलेल्या विषारी द्रव्याने मृत झालीय…त्यात कोणताही जीव जीवंत राहणं अशक्यच…’. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive 1 / Archive 2
तथ्य पडताळणी
दिल्लीतील यमुना नदीचा प्रदूषणाच्या फोटोंबाबत आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता देशभरातील तेलगू, गुजराती, बंगाली, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील जगभरातील माध्यमांनी या छायाचित्राचा वापर करत दिल्लीतील प्रदूषणाचे छट पुजेच्या दिवशीचे म्हणजेच 2019 मधील भयावह छायाचित्र म्हणून हे छायाचित्र प्रसिद्ध केले असल्याचे दिसून आले.
परंतु, अधिक शोध घेतला असता द इंडियन एक्स्प्रेसने 8 नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केलेले फोटो आढळले. या फोटो गॅलरीतील अनेक छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात यावर्षीच्या दिल्लीतील छट पुजेच्या वेळी यमुनातील प्रदूषणाची स्थिती म्हणून पसरत असल्याचे स्पष्ट झाले.
तसेच रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे एक ट्विटही आम्हाला दिसून आले. हे छायाचित्र द इंडियन एक्स्प्रेसच्या जुन्या फोटो गॅलरीत नाही.
त्यामुळे समाजमाध्यमात पसरत असलेली ही छायाचित्रे काही जुनी तर काही नुकतीच घेतलेली आहेत.
निष्कर्ष
दिल्लीतील यमुना नदीतील प्रदूषणाची काही छायाचित्रे ही नोव्हेंबर 2016 मधील आहेत तर काही छायाचित्रे ही 2019 मधील आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळली आहे.

Title:यमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Partly False
