सोशल मीडियावर एका बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये हिंदूंना आता स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र वापरण्याची सरकारने परवानगी दिली, असा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, सरकारने अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, “हिंदूंना आता स्वता: च्या संरक्षणासाठी शस्त्र वापरण्याची परवानगी. आता परवानगी भेटली पण त्याचा गैरफायदा नाही घेणार. आता धर्मरक्षणासाठी आणि स्वत: च्या रक्षणासाठी हत्यार उचलणार.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर सर्च केले असता हिंदूना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळल्याची एकही बातमी आढळली नाही.

व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट एबीपी माझा वाहिनीचा आहे. हा धागा पकडून शोध घेतल्यावर 21 डिसेंबर 2022 रोजीची बातमी सापडली. परंतु, मूळ बातमीमध्ये लिहिले होते की, “लव्ह जिहाद विरोधात लातूरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा.”

लातूर शहरामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात 21 डिसेंबर रोजी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. एबीपी माझाच्या युट्यूब चॅनलवरदेखील या बातमीचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

https://youtu.be/1WGK4cPE6ao?t=57

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडिट करून चुकीच्या दाव्यासह तो व्हायरल करण्यात आला आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल बातमीमधील स्क्रीनशॉट बनावट आहे. सरकार किंवा न्यायालयाकडून हिंदूना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळालेली नाही. चुकीच्या दाव्यासह बनावट स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हिंदूंना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळाल्याची खोटी बातमी व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False