प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड-सुरक्षा मिळाली आहे का?

False राजकीय | Political

(संग्रहित छायाचित्र) सौजन्य जनशक्ती

सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमध्ये मध्यप्रदेश येथील लोकसभा 2019 निवडणूकीच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड सुरक्षा मिळाली आहे अशी पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने याबाबत सत्य पडताळणी केली आहे.

फेसबुक इम्बेड लिंक

फेसबुकअर्काईव्ह

व्हायरल पोस्टमध्ये 70 साल मे पहली बार ऐसा हुआ है आतंकी हमले की आरोपी को झेड सेक्युरिटी मिली है असा दावा करण्यात आला आहे.

सत्य पडताळणी

यासंदर्भात सत्य जाणण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर प्रज्ञा सिंह ठाकूर झेड सेक्युरिटी असे सर्च केले. या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.

वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप निवडणूक उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक अर्ज भरताना झेड सुरक्षा मिळण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. त्या अर्जानुसार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड सुरक्षा पुरवली जावू शकते, असे बातम्यांत म्हणण्यात आले आहे.  

The New Indian Express l अर्काईव्ह (24 एप्रिल 2019)

NDTV l अर्काईव्ह (24 एप्रिल 2019)

पोस्टमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड सेक्युरिटी मिळाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतू वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये त्यांना केवळ झेड सुरक्षा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा मिळाली आहे की नाही हे शोधण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडोने मध्यप्रदेश निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर माहिती शोधली.

मध्यप्रदेश निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड सुरक्षा मिळाली आहे की नाही याबद्दल माहिती मिळाली नाही. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोने मध्यप्रदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क केला.

  • लोकसभा 2019 मध्यप्रदेश भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड सेक्युरिटी देण्यात आलेली नाही. त्यांना स्थानिक पातळीवर सेक्युरिटी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही झेड प्लस किंवा झेड सेक्युरिटी देण्यात आलेली नाही.

आखिल पटेल,

अतिरिक्त विभागीय पोलीस अधिक्षक,

झोन 1,

भोपाळ, मध्यप्रदेश.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमधील मध्यप्रदेश लोकसभा 2019 भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड सुरक्षा मिळाली हा दावा खोटा आहे.

Avatar

Title:प्रज्ञा सिंह ठाकूर यांना झेड-सुरक्षा मिळाली आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False