ऋषी सुनक यांनी इंग्लंडमध्ये पोंगल साजरा केला का? कॅनाडातील व्हिडिओ व्हायरल

False राजकीय | Political

दक्षिणेकडील राज्यांमध्ये नुकतेच पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील व्हिडिओद्वारे माध्यमातून पोंगलच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे दावा केल जात आहे की, ऋषी सुनक यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत केळीच्या पानावर जेवण करीत पोंगल साजरा केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कॅनडाच्या वॉटरलू शहरात तमिळ समुदाय पोलिस प्रमुख आणि अण्य कर्मचाऱ्यांसोबत पोंगला साजरा करतानाचा आहे. चुकीच्या माहितीसह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये कर्मचारी केळीच्या पानावर जेवण करताना दिसतात. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान श्री. ऋषी सुनक यांनी पोंगल सण साजरा केला. त्यावेळी उपस्थित पाहुणे चक्क केळीच्या पानावर जेवले.” 

मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह 

लोकसत्ता या वृतपत्रानेसुद्धा हा व्हिडिओ वेबसाइटवर शेअर करत अशीच बातमी दिली की, “ऋषी सुनक यांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत लंडनमधील 10 डाउनिंग स्ट्रीटवर पोंगलनिमित्त भोजणाचा आनंद घेतला.”

मूळ पोस्ट — लोकसत्ता | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

कीव्हडर्स सर्च केल्यावर कळले की, हा व्हिडिओ इंग्लंडमधील नसून कॅनडामधील आहे. 

कॅनाडातील वॉटरलू भागातील तमिळ संस्कृती मंडळाच्या फेसबुक पेजवर 16 जानेवारी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तेथील स्थानिक तमिळ नागरिकांनी एकत्र येत वॉटरलू भागात पोंगल साजरा केला होता. त्यानिमित्त शहरातील मान्यवरांनी उपस्थिती लावत पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर जेवण केले होते. 

वॉटरलू येथील तमिळ संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर या कार्यक्रमांचे विविध छायाचित्रे शेअर करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाला वॉटरलू शहराचे महापौर, पोलिस प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

कॅनडातील किचनर शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या शहराचे महापौर बेरी व्रबानोविच यांनी 16 जानेवारी रोजी ट्विट करून म्हटले होते की, स्थानिक तमिळ-कॅनडियन समुदायाने पारंपारिक वेशभुषा आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पोंगल सण साजरा केला. कॅनाडामध्ये अशाप्रकारे सांस्कृतिक विविधता एकत्रित नांदते.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये ऋषी सुनक आपल्या कर्मचाऱ्यांसोबत पोंगल करतानाचा नाही. हा व्हिडिओ कॅनडा येथील तमिळ समुदायाने आयोजित कार्यक्रमाचा आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Avatar

Title:ऋषी सुनक यांनी इंग्लंडमध्ये पोंगल साजरा केला का? कॅनाडातील व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False