Fact Check : पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आलंय का?

False राजकीय

काहीतरी मोठी हालचाल होणार नक्कीच मेहबुबाला नजरबंद केले गेले आहे, अशी माहिती धोतीबा झुले या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी  

मेहबूबा मुफ्ती यांना भारत सरकारने नजरबंद केले का? मेहबुबा मुफ्तींना नजरकैदेत ठेवले आहे का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला खालील परिणाम दिसून आला. 

आम्हाला या परिणामात मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवले असल्याचे कोणतेही वृत्त दिसून न आल्याने आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून जम्मू काश्मीर सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना पुन्हा परतण्यासाठी व्यवस्था करत तात्काळ काश्मीर सोडा अशी सूचना केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

दैनिक लोकसत्ता / Archive

बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी( दि.2 ऑगस्ट 2019) रात्री आपल्या निवासस्थानी एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील इतर प्रादेशिक पक्षांचे नेते सहभागी झाले. त्यात नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन आणि पीपल्स मूव्हमेंटचे शाह फैसल यांनी भाग घेतला. या बैठकीत मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यातील स्थितीवर चर्चा केली. 

बीबीसी मराठी / Archive

मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या व्हेरिफाईड ट्विटर खात्यावरही त्या बडगाम येथे जात असल्याचे 02 ऑगस्ट 2019 रोजी म्हटले आहे. हे ट्विट आपण खाली पाहू शकता. 

काश्मीर रिडर या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविण्याविषयी पत्रकारांना माहिती दिली. पत्रकार परिषदेनंतर त्यांना पायी बाहेर पडण्यास परवानगी नाकारण्यात आली. सुरक्षा कारणास्तव सरकारी बुलेटप्रुफ वाहनातुनच त्यांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली. काश्मीर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आल्याबद्दल मेहबूबा मुफ्ती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

काश्मीर रिडर / Archive

मेहबूबा मुफ्तींना नजरकैद करण्यात आल्याचा दावा करणारा व्हिडिओ आणि त्यानंतर त्या फारुख अब्दुल्लांना भेटायला गेल्या याचा तुलनात्मक व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.  

निष्कर्ष

पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना सरकारने नजरकैद केलेले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना केवळ बुलेटप्रुफ वाहनातच प्रवास करण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्राही स्थगित करण्यात आलेली आहे. मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैद करण्यात आले आहे, ही बाब फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आलंय का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False