शॉर्ट फिल्मधील दृश्ये मदरशामध्ये मुलीशी गैरकृत्य कृत्य म्हणून व्हायरल. वाचा सत्य.

False सामाजिक

एक मुस्लिम व्यक्ती एका विद्यार्थिनीशी लगट करत असल्याचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, मदरशामध्ये मुलींशी असे गैरवर्तन केले जाते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी त हा दावा खोटा आढळला. कारण ही दृश्ये बांग्लादेशमधील एका शॉर्ट फिल्ममधील आहेत. अनेक जण ही दृश्ये खरी घटना म्हणून पसरवित आहेत. 

काय आहे दावा

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये एक व्यक्ती आणि मुलगी पलंगावर बसलेले असतानाचे काही फोटो शेयर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, मदरसे में जालीदार साहब सलमा को कलमा पढाते हुए.

मूळ पोस्ट – फेसबुकआर्काइव्ह 

तथ्य पडताळणी 

व्हायरल फोटोतील घटना नेमकी काय आहे याचा शोध घेतला. त्यासाठी यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केले. 

त्यातून युट्यूबवरील एक व्हिडिओ आढळला. Anna Bala नावाच्या एका बांग्लादेशी युट्यूब चॅनेलने 20 सप्टेंबर 2020 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता.

एक विद्यार्थिनी आणि शिक्षकामधील वादग्रस्त संबंधाविषयी ही फिल्म आहे. 

याविषयी अधिक माहिती घेतली असता कळाले की, ही शॉर्ट क्लिप गेल्या वर्षी अपलोड करण्यात आली होती. BD Tech News या चॅनलने 7 सप्टेंबर 2019 रोजी ती शेयर केली होती. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, बांग्लादेशमधील एका वादग्रस्त शॉर्ट फिल्ममधील काही दृश्ये खरी घटना म्हणून शेयर करण्यात येत आहे. 

Avatar

Title:शॉर्ट फिल्मधील दृश्ये मदरशामध्ये मुलीशी गैरकृत्य कृत्य म्हणून व्हायरल. वाचा सत्य.

Fact Check By: Milina Patil 

Result: False