भेसळयुक्त दुधामुळे 87 टक्के भारतीयांना कॅन्सर होण्याची फेक बातमी व्हायरल; वाचा सत्य
पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे येत्या दोन वर्षांत 87 टक्के भारतीयांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, अशी बातमी व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा इशारा दिल्याचे बातमीच्या कात्रणामध्ये म्हटले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा कोणताही इशारा दिलेला नाही.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले की, पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के भारतीयांना कॅन्सर होणार. जागितक आरोग्य संघटनेने दिलेला हा इशारा लोकांपासून लपवून ठेवण्यात आला.
तथ्य पडताळणी
व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये म्हटले की WHO ने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की, कर्करोगासाठी पिशवीतील भेसळयुक्त दूध कारणीभूत आहे.
WHO च्या वेबसाईट या सर्वेक्षणाचा शोध घेतला असता अशी काहीच माहिती आढळून आली नाही. उलट WHO च्या वेबसाईटवर या व्हायरल दाव्याचे खंडन करणारा मेसेज मात्र आढळला.
त्यात म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने भेसळुयक्त दूधासंदर्भात भारत सरकारला कोणताही इशारा दिलेला नाही. मीडियामध्ये WHO च्या नावाने चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत.
मूळ वेबसाईट – जागतिक आरोग्य संघटना
अधिक शोध घेतल्यावर कळाले की, 2019 साली संसदेमध्ये खासदार संजय मंडलिक यांनी तत्कालिन आरोग्यमंत्र्यांना कथित WHO च्या इशाराबाबत प्रश्न विचारला होता. भेसळयुक्त दूधामुळे कॅन्सर होण्यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणता इशारा दिला का? असा मंडिलक यांनी प्रश्न विचारला होता.
त्यावर उत्तर देताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले होते की, WHO कडून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. भारत सरकार आणि WHO दोघांनी या मेसेजचे खंडन केले आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, WHO ने भेसळयुक्त दुधामुळे भारतात 87 टक्के लोकांना कॅन्सर होणार असा इशारा दिलेला नाही. ती फेक न्यूज आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:भेसळयुक्त दुधामुळे 87 टक्के भारतीयांना कॅन्सर होण्याची फेक बातमी व्हायरल; वाचा सत्य
Written By: Agastya Deokar
Result: False