अलिगढमध्ये 3 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य.

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

देशभरात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार निश्चितच गंभीर समस्या आहे. परंतु, सोशल मीडियावर अशा संवेदनशील घटनांच्या नावे अनेकवेळा चुकीचे दावे करणारे व्हिडियो आणि फोटो शेयर केले जातात.

गेल्या अठवड्याभरापासून सोशल मीडियावर एका तीन वर्षीय मृत मुलीचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, अलिगढ शहरामधील या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, हा दावा खोटा आहे. या मुलीचा मृत्यू अपघातामध्ये जखमी झाल्यामुळे होता.

काय आहे दावा

सुमारे एका मिनिटाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये पोलिस एका चिमुकलीचा मृतदेह तिच्या आईच्या ताब्यात देताना दिसतात. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, अलिगढमध्ये तीन वर्षांच्या या मुलीची बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आली.

Facebook | Archive 

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम अलिगढ शहरातमध्ये अशी घटना घडली का याची माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने (हिंदी) अलिगढच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. अरविंद कुमार यांच्याशी संपर्क साधला. सदरील व्हिडिओसोबत केला जाणारा दावा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “सोशल मीडियावर पसरत असणारा दावा खोटा आहे. या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबर रोजी या मुलीचा अपघात झाला होता. यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा मृत्यू अपघातात झालेल्या इजांमुळे झाला आहे. तिच्या मृतदेहाचे फोटो आणि व्हिडिओ शेयर करून अफवा पसरविल्या जात आहे.” 

सोशल मीडियांवरील अफवांना उत्तर देण्यासाठी अलिगढ पोलिसांनी ट्विटरवर या घटनेविषयी स्पष्टीकरणसुद्धा दिले आहे. 4 नोव्हेंबरला अपघात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या अहवालामध्ये तिच्यावर कुठलाही अत्याचार झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना या मुलीविषयी चुकीच्या पोस्ट शेयर न करण्याचे आवाहन केले आहे.

Archive 

या घटनेसंदर्भात अलिगढचे अधीक्षकांनी व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “मृत मुलीच्या आई-वडिलांमध्ये वाद असल्यामुळे ते वेगळे राहत होते. मृत मुलगी आपल्या आईसोबत राहायची होती. या मुलीचा मृतदेह वडिलांच्या गावी नेण्यात येणार असून, तिथेच तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.” 

Archive

ट्विटरवर सदरील व्हायरल व्हिडिओ शेयर करून चुकीचा दावा करणाऱ्याला उत्तर देताना अलिगढ पोलिसांनी त्या मुलीच्या आईचा जबाब अपलोड केला. त्यामध्ये ती सांगते की, “माझी मुलगी गेटसमोर खेळत होती तेव्हा तिचा अपघात झाला. तिच्याविषयी चुकीची माहिती पसरविली जात आहे.”

Archive 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, अलिगढमध्ये तीन वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा दावा खोटा आहे. सदरील मुलीचा मृत्यू अपघातात जखमी झाल्यामुळे झाला होता. 

Avatar

Title:अलिगढमध्ये 3 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य.

Fact Check By: Milina Patil 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •