सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अर्धनग्न अवस्थेतील दोन महिला आणि एक पुरुषाला काही लोक मारहाण करत आहेत. दावा केला जात आहे की, महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवणारा हा व्यक्ती भारतीय हिंदू गुरू आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ भारतातील नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका बाजुला एका हिंदू गुरुचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजुला एक व्यक्ती आणि दोन महिलांना मारहाण केली जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “बाबा जय गुरुजी आपल्या आश्रमातल्या OYO च्या शाखेत "कपडे नावाच्या संकटात" पडलेल्या "धर्म नावाच्या महिलेची" सुटका करत असताना धर्म विरोधी आणि देशद्रोही असणाऱ्या लोकांच्या हातात सापडले आणि मग त्या धर्मद्रोह्यांनी बाबांच्या धर्म कार्याची वाट लावली !” 

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, एका व्यक्तीने आपल्या टिकटॉक अकाउंटवर हा व्हिडिओ श्रीलंकामधील एका बौद्ध भिक्षुचा असल्याचे सांगितले.

आर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर कळाले की, श्रीलंकेच्या एका युट्युब चॅनलवर व्हायरल व्हिडिओमधिल काही दृष्य शेअर केले होते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सुमनाची गोष्ट पुढे सरकते. महिला गर्भवती आहे.”

https://youtu.be/PCFN625yng8

आर्काइव्ह

डेली मिऱरच्या बातमीनुसार नवागामुवा पोलिसांनी 8 जुलै रोजी नवागामुवाच्या बोमिरिया भागातील रसापना येथे एका घरात भिक्षू पल्लेगामा सुमना थेरा आणि दोन महिलांवर हल्ला केल्याप्रकरणी आज आठ जणांना अटक करण्यात आली होती.

भिक्षु पल्लेगामा सुमना थेरा यांनी तक्रार केली की. “मी आणि संबंधित एक महिला व तिची मुलगी घरात राहत असताना, काही अज्ञात तरुणांनी आमच्यावर हल्ला केला आणि घरातील फर्निचरचे नुकसान केले.”

या घटनेनंतर श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री तिरन अल्लेस यांनी पश्चिम भागाचे डीआयजी देशबंदू थेनाकून आणि नवागामुवा ओआयसी यांना भिक्षू आणि दोन महिलांवर हल्ला करणाऱ्या संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

नवागामुवा पोलिसांनी चार जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले होते. काही दिवसांत अटक करण्यात आलेल्या आठ संशयितांना कडूवेला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये फोटो कोणाचा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका बाजुला दाखललेल्या फोटोमधील व्यक्ती निर्मल सिंहजी महाराज आहेत, ज्यांना बडे महाराज म्हणून ओखले जाते. त्यांचा श्रीलंकेतील प्रकरणाशी काही संबंध नाही. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती वेगळा आहे.

खालील तुनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की,  व्हायरल फोटोमधील दोन्ही वेगवेगळे व्यक्ती आहेत.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली व्यक्ती भारतातील हिंदू गुरू नाही. ही घटना श्रीलंकामध्ये घडली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:महिलांसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून हिंदू धर्मगुरुला मारहाणीचा खोटो व्हिडियओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False