FAKE NEWS: स्वामी विवेकानंद क्रिकेट खेळतानाचा हा फोटो नाही

Altered सामाजिक

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यात एक लक्षवेधून घेणारा फोटोदेखील शेअर होत आहे. क्रिकेट गोलंदाजाच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून स्वामी विवेकानंद आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा फोटो स्वामी विवेकानंद यांचा नाही.

काय आहे पोस्टमध्ये?

कृष्णधवल फोटोसोबत म्हटले, की “एक अत्यंत दुर्मिळ छायाचित्र. 1884 साली ईडन गार्डन मैदानावर नरेंद्रनाथ दत्ता (जे नंतर स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले) कलकत्ता टाऊन क्लबसाठी गोलंदाजी करताना.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले गेटी इमेज या वेबसाईटवर या फोटोसारखे एक छायाचित्र मिळाले. फोटोखालील कॅप्शननुसार हा फोटो हेडले वेरिटी नावाच्या यॉर्कशायर क्रिकेटपटूचा आहे. 1940 साली हा फोटो काढण्यात आला होता.

वर दिलेला मूळ फोटो आणि विवेकानंदांच्या नावाने व्हायरल होणारा फोटो या दोहोंची तुलना केल्यावर कळते की, हेडली यांच्या फोटोवर विवेकानंदांचा चेहरा लावलेला आहे.

हा फोटो जरी विवेकानंदांचा नसला तरी, ते उत्तम क्रिकेट खेळायचे असे म्हटले जाते. ते कोलकाता शहरातील त्याकाळातील टाऊन क्लबकडून खेळायचे. असेदेखील म्हटले जात, की ईडन गार्डनवरील एका मॅचमध्ये त्यांनी सात विकेट घेऊन आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता.

निष्कर्ष

या वरून स्पष्ट होते, की व्हायरल होत असलेला फोटो स्वामी विवेकानंदांचा नाही. हा फोटो यॉर्कशायर क्रिकेटर हेडली वेरिटी यांचा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE NEWS: स्वामी विवेकानंद क्रिकेट खेळतानाचा हा फोटो नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Altered


Leave a Reply