हा व्हिडिओ इंडोनेशियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही; ती कॉम्प्युटर ग्राफिक्सने तयार केलेली क्लिप आहे

False आंतरराष्ट्रीय | International

इंडोनेशियामध्ये 21 नोव्हेंबर रोजी 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 268 लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ज्वालामुखी उद्रेकानंतर आलेल्या कथित भूकंपाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियामधील सुमात्रा येथे पाण्याच्या आत झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचा आहे. यात पाण्याच्या आतून बाहेर पडणारा ज्वालामुखी किनाऱ्यावर येताना दिसतो. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा खराखुऱ्या ज्वालामुखीचा व्हिडिओ नाही. कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार करण्यात आलेला व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. 

काय आहे दावा?

व्हिडिओसोबत म्हटले आहे की, “अंडरवॉटर ज्वालामुखीचा उद्रेक, सुमात्रा इंडोनेशिया येथून चित्रित केलेला व्हिडिओ. तुमच्या फोनची स्क्रीन रिकामी होईल. (क्लायमॅक्सचे साक्षीदार होण्यासाठी कृपया १५ सेकंद प्रतीक्षा करा) एकदम थरारक! …हा व्हिडिओ चुकवू नका.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओतील कीफ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून न्यूझीलंडमधील एका संग्राहलयाच्या युट्यूब चॅनेलवर तीन वर्षी हाच व्हिडिओ अपलोड केल्याचे आढळले. 

ऑकलंड शहरातील युद्धसंग्राहलयाने 19 डिसेंबर 2019 रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. सोबतच्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो हे दाखविणारा हा शैक्षणिक व्हिडिओ आहे. 

व्हिडिओचे शीर्षाक आणि तपशीलामध्ये स्पष्टपणे या व्हिडिओला Simulation असे म्हटलेले आहे. हा व्हिडिओ कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार करण्यात आलेला आहे. तो खऱ्या ज्वालामुखी उद्रेकाचा नाही.

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर येणारा भूकंप कसा असतो याची अनुभूती देणारा हा शैक्षणिक व्हिडिओ ऑकलंड युद्धसंग्राहलयाच्या ‘ज्वालामुख गॅलरी’मध्ये दाखवण्यात येतो.

या विभागात ज्वालामुखीसंदर्भातील संपूर्ण माहिती आणि वस्तुस्थितीचे प्रदर्शन उभारण्यात आलेले आहे. 

मेट्रो वेबसाईटवरील बातमीनुसार,ज्वालामुखी अभ्यास कोलिन विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. महाज्वालामुखीचा न्यूझीलंडला कसा धोका आहे हे याविषयी पडताळणी करणाऱ्या प्रकल्पावर ते काम करतात. 

या व्हिडिओमध्ये न्यूझीलंडमधील रॅगिंटो बेटावरील ज्वालामुखीचा जर उद्रेक झाला तर काय परिस्थिती उद्भवेल हे दाखविलेले आहे.

मूळ बातमी – मेट्रो

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ इंडोनेशियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही. मूळात हा व्हिडिओ खऱ्याखुऱ्या ज्वालामुखीचा नसून, न्यूझीलंडमधील ऑकलंड युद्धसंग्राहलयाने कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार केला आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हा व्हिडिओ इंडोनेशियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही; ती कॉम्प्युटर ग्राफिक्सने तयार केलेली क्लिप आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False