
विमानामधून काही सैनिक हवेत उडी मारतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय सेनेचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ भारतीय सेनेचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
हा व्हिडिओ भारतीय सेनेचा नसून स्पेनमधील असल्याचे तथ्य पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
काय आहे दावा?
हा व्हिडिओ इंडियन मिलिटरी म्हणजेच भारतीय सेनेचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.
तथ्य पडताळणी
भारतीय सेनेचा हा व्हिडिओ आहे का, याचा रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोध घेतला. त्यावेळी युटूयूबवर “Spanish A400M Massive Jump” शीर्षकाने खालील व्हिडिओ दिसून आला.
स्पॅनिश हवाई दलाच्या यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, हवाई दलाच्या पहिल्या पॅराशूट कंपनीच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त आज अल्केन्टेरिला एअर बेस (मर्सिया) येथील लष्करी पॅराशूटिंग शाळेत (ईएमपी) – `मंदीज परडा´मधील 114 सैनिकांनी ए – 400 एम या लष्करी परिवहन विमानाच्या उतारावरून जोरदार उडी घेतली.
निष्कर्ष
भारतीय सेनेचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. स्पेनमधील हवाई दलाचा हा व्हिडिओ आहे.

Title:स्पेनमधील व्हिडिओ भारतीय सेनेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False