सुखोई विमानांनी हे त्रिशूल साकारले का? वाचा सत्य

False सामाजिक

महादेवाचे त्रिशूल सुखोई मिग विमानांनी साकारले होते, भारतीय हवाई दलाला सलाम, मजा आली, जयहिंद अशी माहिती देत समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Trishul claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

सुखोई विमानांनी त्रिशूल साकारल्याचे हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या परिणामात आम्हाला टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीचा 25 जानेवारी 2016 रोजीचा खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत दिसणारी त्रिशूलाची दृश्ये पाहिल्यावर ती छायाचित्रापेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले.  

Archive 

त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला दुरदर्शनने प्रसारित केलेला भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा म्हणजेच 2020 चा खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओतही दिसणारी त्रिशूलाची दृश्ये पाहिल्यावर ती छायाचित्रापेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले.

Archive

या दोन्ही व्हिडिओतून हे स्पष्ट झाले की, हे दृश्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यात साकारण्यात आलेल्या त्रिशूलाचे नसून भिन्न आहे. आम्ही 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण व्हिडिओ खाली दिला असून यातही हे दृश्य कुठेही दिसत नाही.

Archive

इंडिया टीव्ही न्यूजने दिलेल्या वृत्तातही हे छायाचित्र दिसून येत नाही. यातून हे छायाचित्र बनावट असल्याचे स्पष्ट होत आहे. मुळ आणि बनावट छायाचित्राची केलेली तुलना आपण खाली पाहू शकता.

image2.png

निष्कर्ष

महादेवाचे त्रिशूल सुखोई मिग विमानांनी साकारल्याचे हे छायाचित्र बनावट आहे. ते प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील नाही.

Avatar

Title:सुखोई विमानांनी हे त्रिशूल साकारले का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False