तथ्य पडताळणी : जनमत कौल, श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेत वाढ सांगणारी ही पोस्ट किती खरी?

False राजकीय | Political

मावळ मतदारसंघ जनमत कौल श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेत गेल्या एका महिन्यात लक्षणीय वाढ अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

NEWS 18 लोकमतने खरंच असा काही सर्वे केला आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा फोटो गुगल रिव्हर्स सर्च इमेजवर सर्च केला. त्यावेळी आम्हाला कोणताही फोटो आढळून आला नाही. त्यानंतर आम्ही NEWS 18 लोकमतच्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल काही माहिती मिळते का? याची पडताळणी केली. तेव्हा तेथेही अशा प्रकारची कोणतीही पोस्ट दिसून आली नाही. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजवरही याबाबतची कोणतीही पोस्ट आढळून आली नाही.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या ट्विटर अकाऊंटवरही याबाबतची पोस्ट आम्हाला आढळून आली नाही.

NEWS 18 लोकमतने याबाबत कोणते सर्व्हे केलेत का? याची पडताळणी केली असता आम्हाला खालील रिझल्ट मिळाला.

अक्राईव्ह लिंक

News 18 लोकमतने घेतलेले जनमत कौल युटूयूबवर शोधले असता आम्हाला खालील निकाल दिसून आला. यात कुठेही या वृत्तवाहिनीने मावळसाठी जनमत घेतल्याचे दिसून आले नाही.

अक्राईव्ह लिंक

यातून स्पष्ट होत आहे की News 18 लोकमतने असा कोणताही सर्व्हे केलेला नाही. सर्व्हेबाबत निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे. यासाठी काय मार्गदर्शक तत्वे आहेत, याची माहिती घेण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गेलो. या माहितीनुसार मतदान होणाऱ्या मतदार संघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज (ओपीनिअन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

अक्राईव्ह लिंक

शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असणाऱ्या दैनिक सामनानेही एक्झिट पोलविषयी 8 एप्रिल 2019 रोजी एक वृत्त दिले आहे. यानुसारही मतदान होणाऱ्या मतदार संघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज (ओपीनिअन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

अक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेत गेल्या एक महिन्यात वाढ झाल्याचा दावा करणारी ही पोस्ट News 18 लोकमतच्या संकेतस्थळावर तसेच पेजवर आढळत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसारही असा कौल घेता येत नाही अथवा जाहीर करता येत नाही. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनानेही याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : जनमत कौल, श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेत वाढ सांगणारी ही पोस्ट किती खरी?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False