सापासारखे स्टॉकिन्स घातल्याने पत्नीला पतीने साप समजून बेदम मारले का?

False आंतरराष्ट्रीय

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सापासारखे स्टॉकिन्स घातलेल्या पत्नीला साप समजून नवऱ्याने बेदम मारल्याने तिच्याला पाया दुखापत झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर पतीने पत्नीला साप समजून पायाला मारल्याने पत्नी गंभीर जखमी अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये पत्नीने सापासारखे स्टॉकिन्स पायात घातल्याने, पतीने साप समजून पत्नीला मारहाण केली असे म्हटले आहे. तसेच या पोस्टमध्ये सापासारखे स्टॉकिन्स घातलेले पाय आणि जखमी असलेला पाय असे दोन्हीही फोटो देण्यात आलेले आहे. पतीने पत्नीला साप समजून पायावर बेसबॅटने मार दिल्यानंतरचा जखमी पायाचा फोटो दाखविण्यात आलेला आहे. ही बातमी झी 24 तास या फेसबुक पेजवर व्हायरल झाली आहे.

याविषयी सत्य जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम पोस्टमधील बातमीमध्ये दाखविण्यात आलेल्या सापासारखे स्टॉकिन्स घातलेल्या पायाचा फोटोची गुगल रिव्हर्स इमेज सर्च केली. पोस्टमधील बातमीमध्ये दाखविण्यात आलेले सापासारखे स्टॉकिन्स घातलेले पाय आणि जखमी पाय हे दोन्हीही एकाच महिलेचे आहेत का हे शोधले. त्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज केल्यानंतर सापासारखे स्टॉकिन्स घातलेले पाय असलेला फोटो ट्विटरवर Mimi या अकाउंटवर आढळले. हे ट्विट जपानी भाषेतील असून, त्या ट्विटचे इंग्रजी भाषांतर आपण येथे वाचू शकता. या भाषांतरामध्ये आपण सापासारखे असणारे हे पायाला घट्ट चिकटणारे स्टॉकिन्स विकत घेतलेले आहेत. पण हे फोटोमध्ये दाखविण्यात आलेले साप नसून माझे दोन पाय आहेत असे स्टॉकिन्स विकत घेतलेल्या महिलेने म्हटले आहे.

पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला दुसरा फोटो हा पायाला जखम झाल्यानंतरचा आहे. या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज केल्यानंतर हा मुळ फोटो wordpress.com या वेबसाईटवर पायाला जखम झाल्यानंतर पायाला टाके कसे घातले जातात आणि पट्टी कशी केली जाते याचे प्रशिक्षण देताना घेण्यात आलेला फोटो आहे.

WordPress.com l अर्काईव्ह

काय पतीने पत्नीला साप समजून मारले का?

  • पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या महिलेचे स्टॉकिन्स घातल्यानंतरचे पाय आणि जखमी पाय जर एकाच महिलेचे असतील तर त्या महिलेचा फोटो का देण्यात आलेला नाही असा संशय पोस्ट पाहिल्यावर मनात येतो. तसेच महिलेच्या बाबतीत देण्यात आलेली माहिती अत्यंत त्रोटक असून, त्या माहितीच्या आधारे बातमी सत्य असेल याबाबतही शंका निर्माण होते.
  • सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सांगण्यात आलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियात झालेल्या एका घटनेत महिलेने पायात सापासारखे स्टॉकिन्स घातल्याने आपल्या पत्नीच्या पायांना साप समजून मारल्याने पायाला झाली जखम संदर्भात बातमीमध्ये दाखविण्यात आलेले फोटो वेगवेगळे आहेत. ते एकाच महिलेचे नाहीत.
  • सर्व संशोधनानुसार सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये दाखविण्यात आलेले महिलेच्या पायात सापासारखे घातलेले स्टॉकिन्स आणि जखमी पायाचा फोटो हा एकाच महिलेचा नाही हे आढळते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट असत्य आहे.

निष्कर्ष : संपुर्ण संशोधनाअंती पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या सापासारखे स्टॉकिन्स घातल्याने पत्नीला पतीने साप समजून मारले हे असत्य आहे. कारण पोस्टमध्ये दाखविण्यात आलेले दोन्हीही फोटो हे वेगवेगळ्या महिलेचे असून, एकाच महिलेचे नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:सापासारखे स्टॉकिन्स घातल्याने पत्नीला पतीने साप समजून बेदम मारले का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False