विश्व हिन्दू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याचा व्हिडिओ नसीरुद्दीन शाह यांच्या बंधूचा म्हणून व्हायरल

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा भाऊ रिजवान अहमद यांचा हा व्हिडिओ ऐकण्यासारखा आहे. त्यांनी जे सत्य मांडले आहे ते आजपर्यंत कोणीच नाही मांडलं, असा दावा करत समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. नरेंद्र मिरजकर यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा भाऊ रिजवान अहमद यांचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा भाऊ रिजवान अहमद यांचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ अतिशय बारकाईने पाहिला. या व्हिडिओवर युथ मीडिया टीव्ही असा लोगो आम्हाला दिसून आला. आम्ही युटुयूबवर या चॅनलवर या व्हिडिओचा शोध घेतला. याठिकाणी दोन जानेवारी 2020 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असल्याचे आम्हाला दिसून आले. या ठिकाणी शीर्षकात “आईआईटी कानपुर में आज लगे नारे,क्या देश का माहौल ख़राब किया जा रहा है? IIT-Kanpur Faiz poem News today |” असे म्हटले असल्याचे दिसून आले.

Archive

त्यानंतर आम्ही यूथ मीडिया वाहिनीशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, ते नसीरुद्दीन शाह यांचे भाऊ नाहीत. ते अयोध्येतील महाराज आहेत. ते नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीएएच्या समर्थनार्थ आले होते. त्यांना आयआयटी कानपूर येथे होणाऱ्या विरोधाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी दिलेले हे उत्तर आहे.

आम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ शोधला. त्यावेळी याठिकाणी “आचार्य धर्मेन्द्र- VHP CAA विरोधात आणि ओवैसी बंधूंविरोधात बोलत असताना, असे म्हटले असल्याचे दिसून आले.

Archive

त्यानंतर आम्ही आचार्य धर्मेन्द्र- VHP याच्याविषयी शोध घेतला असता खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत त्यांचा परिचय विश्व हिंदू परिषदेचे नेते असा करुन देण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती आणि खालील व्हिडिओतील व्यक्ती एकच असल्याचे आपण पाहू शकता.

Archive

त्यानंतर आम्हाला टाईम्स नाऊद्वारे प्रसारित करण्यात आलेले एक बातमीपत्र सापडले. यात आपण रिजवान अहमद यांना पाहू शकतो. ते डाव्या कोपऱ्यात संबित पात्रा यांच्या शेजारी बसले आहेत.

Archive

विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते आचार्य धर्मेन्द्र आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे बंधू रिजवान अहमद यांचे तुलनात्मक विश्लेषण आपण खाली पाहू शकता. 

image1.png

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट होत आहे की, व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे बंधू रिजवान अहमद नाहीत तर विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते आचार्य धर्मेन्द्र आहेत.

Avatar

Title:विश्व हिन्दू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याचा व्हिडिओ नसीरुद्दीन शाह यांच्या बंधूचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •