MDH चे मालक धर्मपाल गुलाटी यांच्या अंतिम क्षणांचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे नुकतेच निधन झाले. मसाल्याच्या जाहिरातीमुळे ते लोकप्रिय होते. सोशल मीडियावरसुद्धा त्यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली. 

अनेकांनी हॉस्पिटल बेडवर असलेल्या गुलाटींचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये एक व्यक्ती त्यांच्यासाठी हिंदी गीते गात आहे. दावा केला जात आहे की, महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनापूर्वीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ गुलाटी यांच्या शेवटच्या क्षणांचा नाही.

काय आहे दावा?

लाल टी-शर्टमधील एक व्यक्ती हॉस्पिटल बेडवर असलेल्या गुलाटींसाठी गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर करून म्हटले की, MDH मसाला किंग महाशय धर्मपाल यांचा अंतिम वेळेचा व्हायरल व्हिडिओ.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

फेसबुकवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला. 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता. अनेक सेलिब्रेटिंनासुद्धा तो शेअर करीत हाच दावा केला की, तो धर्मपाल गुलाटी यांच्या अंतिम क्षणांचा व्हिडिओ आहे. 

अशाच एका ट्विटला उत्तर देताना एका व्यक्तीने कमेंट केली होती, लाल टी-शर्टमधील व्यक्ती त्यांचे मोठे बंधू राकेश आहुजा आहेत.

हा धागा पकडून मग शोध घेतल्यावर फेसबुकवर राकेश आहुजा यांचे अकाउंट सापडले. त्यावर त्यांनी 4 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता.

मूळ पोस्ट – फेसबुक 

फॅक्ट क्रेसेंडो ओडियाने राकेश आहुजा यांच्या संपर्क साधून या व्हिडिओबाबत अधिक माहिती जाणून घेतली. त्यांनी सांगितले की, “हा व्हिडिओ नोव्हेंबर 2019 मधील आहे. तो गुलाटी यांच्या अंतिम क्षणाचा व्हिडिओ नाही. माझा संगीतोपचार पद्धतीमध्ये विश्वास आहे. गुलाटी यांना दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना हाताचीसुद्धा हालचाल करता येत नव्हती. मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या आवडीची गाणी गायली. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या केले जाणारे दावे चुकीचे आहेत.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सदरील व्हिडिओ धर्मपाल गुलाटी यांच्या अंतिम क्षणांचा नाही. तो गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. तो चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

Avatar

Title:MDH चे मालक धर्मपाल गुलाटी यांच्या अंतिम क्षणांचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Misleading


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •