मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Partly False सामाजिक

मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा अनेक जण समाजमाध्यमात करत आहेत. हा दावा खरा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

काय आहे दावा? 

मास्कवर आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे.

Mask Claim.png

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

मास्क आणि सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याच्या दाव्याविषयी शोध घेतला. त्यावेळी क्लिअरटॅक्स या संकेतस्थळावर 30 जुलै 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली माहिती दिसून आली. या माहितीनुसार कापसापासून बनवलेल्या फेस मास्कवर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. याव्यतिरिक्त असणाऱ्या मास्कवर 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. सॅनिटायझर आणि हँडवॉश यासारख्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

Cleartax.png

Archive

याबाबत फायनॅशल एक्सप्रेस आणि द हिंदू बिझनेस लाईन या संकेतस्थळांनी दिलेले वृत्तही दिसून येते. त्यानंतर https://www.gst.gov.in/ या संकेतस्थळावरही अशीच माहिती दिसून येते. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत जीएसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले. मास्कवर 5 ते 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे.

निष्कर्ष 

मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचे असत्य आहे. मास्कवर 5 ते 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. सॅनिटायझरवर  18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे.

Avatar

Title:मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False