Fact Check : गौतम गंभीर यांचे हे छायाचित्र खरे आहे का?

False राजकीय | Political

भाजप खासदार आपल्या मतदारसंघात गंभीरपणे काम करताना अशी एक पोस्ट अनुराधा पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

गौतम गंभीर यांचे हे छायाचित्र शोधण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्यासमोर खालील परिणाम आले. 

त्यानंतर आम्ही या रिझल्टच्या आधारे गौतम गंभीर यांच्या ट्विटर अकाऊंटवर गेलो. त्याठिकाणी आम्हाला इरफान पठान याच्या एका छायाचित्रास गौतम गंभीर यांनी रिट्विट केल्याचे दिसून आले. या छायाचित्रात गंभीर हा भाजपचे उपरणे घातलले अथवा भगवा फेटा बांधल्याचे दिसून येत नाही. 

याच छायाचित्रात फेरफार करुन गौतम गंभीर यांचे बनावट छायाचित्र तयार करण्यात आल्याचे दिसून येते. खाली या दोन छायाचित्रातील फरक आपण स्पष्ट पाहू शकता. 

निष्कर्ष

गौतम गंभीर यांनी भाजपचे उपरणे घेऊन तसेच भगवा फेटा घालून दाखविण्यात आलेले हे छायाचित्र बनावट आहे. मुळ छायाचित्रात गौतम गंभीर यांनी अशी वेशभूषा केल्याचे दिसत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : गौतम गंभीर यांचे हे छायाचित्र खरे आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False