Fact Check : असदुद्दीन ओवैसी, राजा सिंह यांनी ही वादग्रस्त वक्तव्ये केलीत का?

False राजकीय

हमारे धर्म में गाय काटना जायज बताया गया है, असे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हटल्याची और हमारे धर्म में गाय काटनें वालों का सिर काटना सध्दर्म जायज बताया गया है, असे भाजप आमदार राजा सिंह यांनी म्हटल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहन पाटील यांनी ?फक्त?तुझ्या?आठवणी? या पेजवर ही पोस्ट शेअर केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी   

खासदार असदुद्दीन ओवैसी आणि भाजपचे आमदार राजा सिंह यांनी वरील वादग्रस्त वक्तव्य केले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला ओवैसी यांनी वेळोवेळी गायीच्या बाबतीत वेगवेगळी वक्तव्य केली असल्याचे दिसून आले. 

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सगळ्यात अलिकडच्या काळात म्हणजेच 26 मे 2019 रोजी गायीबाबत एक वक्तव्य केल्याचे दिसून येते. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने हे वक्तव्य प्रसारित केले आहे. यात त्यांनी ‘राईट टू लाईफ’वर बोलताना ते मानवासाठी असून प्राण्यांसाठी नसल्याचे म्हटले आहे. 

भाजपची गायीबद्दलची भूमिका ढोगींपणाची असल्याचे मत ओवैसी यांनी व्यक्त केलेले आहे. दैनिक सकाळने आपल्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. 

दैनिक सकाळ / Archive

भाजपने तेलंगण निवडणुकीत एक लाख गायी दान करण्याचा संकल्प सोडल्यावर  ओवैसी यांनी भाजप मला गाय दान करेल का? असा प्रश्न उपस्थित केला होता. दैनिक लोकसत्ताने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. 

लोकसत्ता / Archive 

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गायीबाबत वेगवेगळी वक्तव्ये केल्याचे दिसून येते मात्र पोस्टमध्ये दावा केलेले वक्तव्य दिसून येत नाही. त्यानंतर आम्ही भाजपचे आमदार राजा सिंह यांनी गायबाबत काय वक्तव्य केली आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला. द वायरने आमदार राजा सिंह यांचे एक वक्तव्य प्रसिध्द केले आहे. या वक्तव्यानुसार गाय ला राष्ट्रमातेचा दर्जा मिळेपर्यंत मॉब लिंचिगच्या घटना थांबणार नाहीत, असे राजा सिंह यांनी म्हटले आहे. 

द वायर / Archive 

फर्स्ट पोस्टने 15 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या वृत्तानुसार आमदार राजा सिंह यांनी महाराष्ट्रातील जळगाव येथे बोलताना भारतात राहून जे गोमांस खातात त्यांच्याकडून घर खरेदी करु नये, असे मत व्यक्त केले होते. 

फर्स्ट पोस्ट / Archive

बीबीसीने राजा सिंह यांच्याबद्दल एक वृत्तात त्यांनी गाय से बढकर हमारे लिए कुछ नही है, इन्सान भी नही है असे म्हटल्याचे दिसून येते. पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केल्याचे मात्र दिसून येत नाही. 

बीबीसीचे मूळ वृत्त / Archive 

निष्कर्ष

खासदार असदुद्दीन ओवैसी आणि भाजपचे आमदार राजा सिंह यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली असल्याचे दिसून येते. या दोघांनीही पोस्टमध्ये दिलेली वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे मात्र दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे आढळून आले आहे.

Avatar

Title:Fact Check : असदुद्दीन ओवैसी, राजा सिंह यांनी ही वादग्रस्त वक्तव्ये केलीत का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False