इटलीमध्ये मृतदेहांचा खच साचल्याचा हा फोटो नाही. हा जर्मनीतील 6 वर्षांपूर्वीचा फोटो आहे. वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोविड-19 या महारागोने इटलीमध्ये थैमान घातले असून आतापर्यंत तेथे पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. इटलीची अशी भयावह परिस्थिती असताना या देशाबद्दल अनेक चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा रस्त्यावर खच साचला, अशा दाव्यासह एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या मेसेजची पडताळणी करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणी केल्यानंतर हा फोटो इटलीमधील नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच या फोटोचा कोरोनाशी काहीही संबंध नाही हे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

images.jpg

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळते की, हा फोटो इटलीमधील नाही. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात 24 मार्च 2014 रोजी आयोजित एका कार्यक्रमातील हा फोटो आहे. नाझींच्या Katzbach  छळछावणीमध्ये मृत पावलेल्या 528 लोकांना अशा अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात आली होती. 

Reuters.png

मूळ फोटो येथ पाहा – रॉयटर्स

Buchenwald आणि Dachau येथील छळछावण्यांमधील 528 लोकांना 24 मार्च 1945 रोजी मारण्यात आले होते. या मृत पीडितांना अभिवादन करण्यासाठी एका कलाकाऱ्याच्या संकल्पनेतून फ्रँकफर्ट शहरात हा उपक्रम राबविण्यात आला होता. याविषयी अधिक सविस्तर येथे वाचू शकता – IB Times | NY Post

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, हा फोटो 6 वर्षे जूना असून, इटलीमधील नाही. या फोटोचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नाही. हा फोटो जर्मनीतील आहे. नाझी छळछावण्यांमध्ये मृत पावलेल्या लोकांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहतानाचा हा फोटो आहे. 

कोरोना संबंधी कोणतीही माहिती, फोटो, व्हिडियो सत्यता तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नये. असे शंकास्पद मेसेज तुमच्याकडे आल्यास ते फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा.

Avatar

Title:इटलीमध्ये मृतदेहांचा खच साचल्याचा हा फोटो नाही. हा जर्मनीतील 6 वर्षांपूर्वीचा फोटो आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •