सत्य पडताळणी: ‘मोदींचे तुकडे-तुकडे करू’ असं म्हटला होता काँग्रेसचा हा नेता, राहुल गांधींनी दिलं लोकसभेचं तिकीट

True राष्ट्रीय

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एक नाव असं आहे ज्यांनी नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करू असं म्हटलं होतं, असे वृत्त lokmat.news18.com या संकेतस्थळाने दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आल्याचे वृत्त अनेक संकेतस्थळांनी दिले आहे.

इंडियन नॅशनल काँग्रेसच्या संकेतस्थळावरही ही यादी उपलब्ध आहे. या यादीत इम्रान मसूद यांचे नाव असल्याचे दिसून येत आहे.

आक्राईव्ह लिंक

इम्रान मसूदने खरोखरच मोदी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधान केले होते का? याचा फॅक्ट क्रिसेंडोने शोध घेतला. यावेळी झी न्यूजचा खालील व्हिडिओ आम्हाला दिसून आला. या व्हिडिओत 1 मिनिट 09 सेकंद ते 1 मिनिट 19 सेकंद या कालावधीत हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

निष्कर्ष
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. ही यादी विविध संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. इम्रान मसूद यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधान केले असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळं फॅक्ट क्रिसेंडोच्या तथ्य पडताळणीत हे वृत्त सत्य आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी: ‘मोदींचे तुकडे-तुकडे करू’ असं म्हटला होता काँग्रेसचा हा नेता, राहुल गांधींनी दिलं लोकसभेचं तिकीट

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True