अक्षयकुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला का? वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

अभिनेता अक्षयकुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. यासोबत असणाऱ्या छायाचित्रात अभिनेता अक्षयकुमार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्याने अशी मदत केली आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. 

screenshot-www.facebook.com-2020.03.26-10_09_56.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

अभिनेता अक्षयकुमारने महाराष्ट्र शासनाला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी एनडीटीव्ही खबर या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार अक्षयकुमारने कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याने कोरोना विषाणूचा प्रसार लागण होऊ नये, यासाठी काळजी न घेणाऱ्यांविषयी राग व्यक्त केला आहे. या वृत्तात कुठेही त्याने महाराष्ट्र शासनाला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचा उल्लेख दिसून आला नाही. हे सविस्तर वृत्त आपण खाली पाहू शकता.

screenshot-khabar.ndtv.com-2020.03.26-14_52_25.png

एनडीटीव्ही खबरने दिलेले सविस्तर वृत्त / Archive

त्यानंतर आम्ही अक्षयकुमारच्या अधिकृत ट्विटर खात्यावर आणि फेसबुक पेजवर गेलो. याठिकाणी त्याने घराबाहेर पडू नये, असे निर्देश असतानाही लोक घराबाहेर का पडत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत कोरोना विषाणूच्या उद्रेकाबाबत विविध ट्विट केल्याचे दिसून आले. याठिकाणीही त्याने महाराष्ट्र शासनाला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे कोणतेही ट्विट दिसून आले नाही. महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हॅन्डलवरील असे कोणतेही ट्विट आम्हाला दिसले नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या संकेतस्थळासही आम्ही भेट दिली. याठिकाणीही अक्षयकुमारने असा कोणताही धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिल्याचे दिसत नाही. त्यानंतर अक्षयकुमार याने असा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द केला का, याची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर खात्यास आम्ही भेट दिली. याठिकाणी याबाबतचे कोणतेही ट्विट आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी 9 मे 2017 रोजी अक्षयकुमार याने केलेले एक ट्विट आम्हाला दिसून आले. या ट्विटमध्ये तो याच पेहरावात दिसत असून त्याने त्याच्या टॉयलेट- एक प्रेमकथा या चित्रपटाची माहिती पंतप्रधानांना सांगितल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Archive

यातून हे स्पष्ट झाले की, अभिनेता अक्षयकुमार याने महाराष्ट्र शासनाला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला ही बाब असत्य आहे.

निष्कर्ष

अभिनेता अक्षयकुमार याने महाराष्ट्र शासनाला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला ही बाब असत्य आहे.

Avatar

Title:अक्षयकुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False