पश्चिम बंगालमधील बोगस मतदानाचा जुना व्हिडिओ कर्नाटकच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय | Political

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 135 जागांसह कर्नाटकमध्ये एकहाती विजय मिळवला. सत्तारुढ भाजपच्या वाट्याला केवळ 66 जागा आल्या. यानंतर सोशल मीडियावर कर्नाटकामध्ये बोगस मतदान आणि ईव्हीएम मशीनची पळवापळवीचे दावे केले जात आहेत. 

यातच भर म्हणजे अनेक मतदारांच्या नावाने बोगस मतदान करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कर्नाटक विधानसभा निवडणुकीमधील आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. जुना व असंबंधित व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मतदान कक्षाजवळ उभा आहे, तर समोर नोंदणी करणारे अधिकारी बसलेले आहेत. मतदाराची नाव नोंदणी करून मतदान कक्षाजवळ उभा असलेला व्यक्तीच त्याच्या नावाने बोगस मतदान करताना दिसतो.

हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये युजर्स लिहितात की, “आणि कर्नाटकमध्ये असा झाला लोकशाहीचा विजय.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, त्यात बंगाली भाषा बोलली जात आहे. 

हा धागा पकडून कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ कर्नाटकचा नसून पश्चिम बंगालमधील आहे.

टीव्ही-9 बंगाल लाईव्ह वाहिनीने 27 फेब्रुवारी 2022 रोजी हा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर अपलोड केला होता.

व्हिडिओसोबत दिलेल्या बातमीनुसार पश्चिम बंगालमध्ये महानगरपालिका निवडणुकदरम्यान बोगस मतदान झाल्याची घटना समोर आली होती.

खबर 24×7 च्या बातमीनुसार हा सर्व प्रकार दक्षिणेच्या दमदम भागातील वोर्ड क्र. 33 च्या ‘लेक व्यू स्कूल’ शाळेच्या बूथ क्र. 108 मध्ये घडला होता.

सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदान सुरू असताना मतदारांना थांबवले आणि त्यांच्या नावावर स्वत: बोगस मतदान केले, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते. 

तसेच भाजपच्या नेत्या अग्निमित्रा पाल यांनी आपल्या फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता.

त्या कॅप्शनमध्ये लिहितात की, “दक्षिण दमदम नगरपालिकेच्या विकासासाठी मतदान सुरु आहे. बुथ क्रमांक 108, प्रभाग क्रमांक 33. आयोगाला बघू द्या.”

भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपआपल्या अधिकृत ट्विटर अकांउटवर व्हिडिओ आणि काही फोटो पोस्ट केले होते.

भाजप –

काँग्रेस – 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकचा नाही. मागिल वर्षी पश्चिम बंगालच्या महानगरपालिका निवडणुकीदरम्यान बोगस मतदान करण्यात आल्याचा प्रकार उघडकिस आला होता. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:पश्चिम बंगालमधील बोगस मतदानाचा जुना व्हिडिओ कर्नाटकच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False