सत्य पडताळणी : भाजप खासदार संजय धोत्रेचे शेतकऱ्यांविषयी अवमानकारक वक्तव्य?

Mixture राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

(छायाचित्र सौजन्य : molitics)

संजय धोत्रे यांचे शेतकऱ्यांविषयीचे अवमानकारक वक्तव्य शेतकऱ्यांना शेती झेपत नसेल तर त्यांनी जीव द्यावा, अशी पोस्ट Dilip Mohod यांच्या पेजवरुन सध्या व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

खासदार संजय धोत्रे यांनी असे वक्तव्य केलं आहे का, याची माहिती घेण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला thenewsminute.com या संकेतस्थळावर एक वृत्त दिसून आले.

आक्राईव्ह लिंक

द हिंदूने खासदार संजय धोत्रे यांच्या वक्तव्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तात तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे हे सुध्दा धोत्रे यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी उपस्थित असल्याचे म्हटले आहे. धोत्रे यांच्या या वक्तव्यावर मोठया प्रमाणावर टीका करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

खासदार संजय धोत्रे यांची या वक्तव्यानंतरची प्रतिक्रियाही द हिंदूने प्रसिध्द केली आहे. या प्रतिक्रियेत धोत्रे यांनी मी अनेक योजनांनंतरही शेतकऱ्यांची स्थिती सुधारत नसल्याने कधीकधी चिडून असे म्हणतो असे स्पष्टीकरण दिले आहे. कापूस पट्टा अशी ओळख असणाऱ्या विदर्भात 72 तासात 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीने म्हटले होते. त्यानंतर धोत्रे यांनी हे वक्तव्य केले होते,

आक्राईव्ह लिंक  
डेक्कन क्रॉनिकलने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

आक्राईव्ह लिंक

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ आम्हाला यूटूयूबवर आढळून आला. या व्हिडिओत 31 व्या सेकंदापासून एक मिनिट 38 सेकंदापर्यंत तुम्ही ते नेमके काय म्हणाले हे पाहू शकता.

ते नेमके काय म्हणाले याचा थोडक्यात सारांश खाली दिलेला आहे.

‘’सेंद्रिय शेती की बीटी कॉटन अशा स्थितीत शेतकरी सापडलाय. कुणीही काही बरोबर सांगत नाही. मला कधीकधी असे वाटते आपली जी धोरणे आहेत त्यामुळे शेतकरी संकटात येऊ लागला. मी तर कितीदा चिडून असे म्हटले आहे की, शेतकऱ्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. मरु द्या त्यांना. ज्याला पटले तो शेती करेल, करणार नाही जे होईल ते होईल.’’

या वक्तव्यावर खासदार संजय धोत्रे यांनी दिलेले स्पष्टीकरणही या व्हिडिओत दाखवण्यात आलेले आहे.  

निष्कर्ष

भाजप खासदार संजय धोत्रे यांनी शेतकऱ्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. मरु द्या त्यांना असे म्हटले आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे आपण चिडून कधीकधी असे म्हणतो असे त्यांनी या वक्तव्यातच स्पष्ट केले आहे. याबाबतचे वेगळे स्पष्टीकरणही त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : भाजप खासदार संजय धोत्रेचे शेतकऱ्यांविषयी अवमानकारक वक्यत्व?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •