Fact Check : ही छायाचित्रे काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतरची नाहीत

False राजकीय सामाजिक

काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर 42 मुले पेलेट गनची शिकार झाली आहेत. यातील अनेक मुलांनी आपले डोळे गमावलेत, अशी माहिती लहान मुलांच्या छायाचित्रासह Drprakash Ghag यांनी पोस्ट केली आहे. Sushilaputra Ashok Dnyaneshwar Gaikwad यांनी भयानक म्हणत हीच छायाचित्रे शेअर केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी  

ही छायाचित्रे नेमकी कधीची आहेत, याचा शोध रिव्हर्स इमेज सर्चद्वारे घेतला. त्यावेळी reddit.com वर हे छायाचित्र सहा महिन्यापूर्वी म्हणजेच 18 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले.

Archive

अक्षय नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर 18 फेब्रुवारी 2019 रोजी एका ट्विटमध्ये हे फोटो वापरल्याचे आपण खालील ट्विटमध्ये पाहू शकता. 

Archive

या दोन्ही बाबींवरुन हे छायाचित्र 18 फेब्रुवारी 2019 रोजीचे अथवा त्यापुर्वीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतर आम्ही कलम 370 हे नेमके कधी रद्द झाले याचा शोध घेतला. टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार हे कलम 6 ऑगस्ट 2019 रोजी रद्द झाल्याचे आपल्याला दिसून येते.

टाईम्स नाऊ मराठी / Archive

या सगळ्या बाबीवरुन हेही स्पष्ट होत आहे की ही छायाचित्रे जुनी म्हणजेच कलम 370 रद्द होण्यापुर्वीची आहेत. संभ्रम निर्माण करण्यासाठी ती समाजमाध्यमांमध्ये पसरविली जात आहेत. 

निष्कर्ष 

काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पेलेट गनचा वापर करण्यात आला. यात जखमी झालेल्या लहान मुलांची ही छायाचित्रे असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Avatar

Title:Fact Check : ही छायाचित्रे काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतरची नाहीत

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False