सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये बजरंग दल, आरएसएस आणि व्हीएचपी यांना उग्रवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे असे म्हटले आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

या पोस्टमध्ये बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद या तीनही संघटनांचे प्रातिनिधिक स्वरुपात फोटो दाखवले असून, त्या फोटोच्या खाली उग्रवादी संघटन घोषित कर दिया असे लिहिलेले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टविषयी गुगलवर सर्च केले. पोस्टमध्ये देण्यात आलेला सीआयएचा रिपोर्ट हा जून 2018 मधील आहे असे समोर आले आहे.

सर्वात प्रथम पोस्टबद्दल सीआयए या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर या रिपोर्टबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या वेबसाईटवर या विषयाची पोस्ट वर्तमानकाळात आढळून येत नाही.

सीआयएअर्काईव्ह

त्यानंतर या वेबसाईटच्या प्रेस रिलीज या विभागावर क्लिक केल्यानंतर वर्षानुसार सीआयएचे प्रेस रिलिज येथे देण्यात आलेले आहेत. या प्रेस रिलिजमध्ये वर्ष 2019 आणि 2018 या दोन्हीही वर्षांच्या जून महिन्याच्या रिपोर्टमध्ये बजरंग दल, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेबद्दलचा रिपोर्ट उपलब्ध नाही.

सीआयएअर्काईव्ह

पोस्टमध्ये देण्यात आलेल्या द प्रिंट या इंग्रजी वृत्तपत्रामध्येही याविषयावर बातमी प्रसिद्ध झालेली आहे. ही बातमी 14 जून 2018 रोजी प्रसिद्ध केली आहे. या बातमीमध्ये केवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन संघटनांचाच उल्लेख दहशतवादी धार्मिक संघटना (militant religious outfits - मिलिटंट रिलिजीअस आऊटफिट) म्हणून करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस याचा या बातमीमध्ये ( nationalist organization - नॅन्शलिस्ट ऑरगायझेशन) राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे.

द प्रिंटअर्काईव्ह

पोस्टमध्ये करण्यात आलेल्या संघटनांबद्दल इतर वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता. इतर वृत्तपत्रातही केवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचाच दहशतवादी धार्मिक संघटना असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी विचारसरणीची संघटना म्हटले आहे. हे वृत्त 15 जून 2018 रोजी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाअर्काईव्ह

आज तकअर्काईव्ह

  • व्हायरल पोस्टमध्ये बजरंग दल, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद या तिन्ही संघटनांच्या बाबतीत उग्रवादी संघटना असे लिहिलेले आहे. परंतू संशोधनाअंती असे समोर आले आहे की, सीआयएने 2018 मध्ये जून महिन्याच्या मध्यवर्ती असा रिपोर्ट दिला होता. परंतू नंतर तो रिपोर्ट सीआयएच्या वेबसाईटवर आता वर्तमानात उपलब्ध नाही. त्यामुळे त्यावेळेचा दिलेला रिपोर्ट सीआयएने काढून घेतलेला आहे.
  • वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की जून 2018 मध्ये हा रिपोर्ट सीआयएने दिला होता. पण नंतर तो सीआयएनेच वेबसाईटवरुन काढून टाकला आहे. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या बाबतीत अशा प्रकारचा कोणताही रिपोर्ट उपलब्ध नाही.
  • सीआयएच्या 2018 च्या रिपोर्टमध्ये केवळ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या दोन संघटनांनाच उग्रवादी असे म्हटले होते. परंतू आरएसएस या संघटनेला राष्ट्रीय संघटना असे त्यांनी म्हटले होते. परंतू व्हायरल पोस्टमध्ये सर्व संघटनांना उग्रवादी असे लिहिण्यात आलेले आहे.
  • व्हायरल होणाऱ्या पोस्टची तारीख देखील 15 जून 2018 असल्यामुळे जुनी पोस्ट लोकसभा 2019 निवडणूक अनुषंगाने जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष :  सीआयएच्या अहवालात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या दोन संघटनांना militant religious outfits घोषित करण्यात आले होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय विचारसरणीची संघटना म्हटले आहे. त्यामुळे पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती संमिश्र स्वरुपाची आहे.

Avatar

Title:सीआयएने बजरंग दल, आरएसएस आणि व्हीएचपी यांना दहशतवादी संघटना घोषित केले का?

Fact Check By: Amruta Kale

Result: Mixture