हा फोटो अफगाणिस्तानातील महिला पायलट साफिया फिरोजी यांचा नाही; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून काढता पाय घेताच तालिबानने तेथे ताबा मिळवला. इतिहास पाहता तालिबानी राजवटीमध्ये महिलांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्ती केली जात आहे. 

या पार्श्वभूमीवर एका रक्तबंबाळ झालेल्या महिलेचा फोटो शेअर करुन दावा केला जात आहे की, अफगाण हवाई दलातील महिला वैमानिक साफिया फिरोजी हिची अशी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. हा फोटो साफिया फिरोजी यांचा नाही.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

साफिया फिरोजी यांची खरंच हत्या करण्यात आली का, याचा शोध घेतला असता तशी कोणतीही अधिकृत बातमी आढळली नाही. जगभरातील मीडियाचे लक्ष सध्या अफगाणिस्तानवर लागलेले आहे. त्यामुळे एवढी मोठी बातमी लपून राहणार नाही. परंतु, अशी काही घटना घडल्याचा कुठेच उल्लेख नाही. 

मग व्हायरल फोटो खरंच साफिया फिरोजी यांचा आहे का? 

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो फरखुंदा मलिकजादा नामक महिलेचा आहे. कुराणची पाने जाळण्याचा तिच्या आरोप होता.

स्रोत – Onedio

न्यू यॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार, 27 वर्षीय फरखुंदा या महिलेवर कुराण जाळल्याचा खोटा आरोप लावण्यात आला होता. या आरोपामुळे संतप्त झालेल्या जमावाने 19 मार्च 2019 काबुलमध्ये भरदिवसा तिची हत्या केली होती. 

बीबीसीने फरखुंदाच्या हत्येविषयी एक सविस्तर बातमी प्रसारित केली होती. तिच्या हत्येविषयी अधिक माहिती यामध्ये तुम्ही पाहू शकता.

या घटनेचे संपूर्ण जगभराती प्रतिसाद उमटले. पोलिसांच्या चौकशीमध्ये कळाले की, फरखुंदा या महिलेने कुराणची पाने जाळली नव्हती. तिच्यावर खोटा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणी तीन पुरुषांना 20 वर्षांच्या तुरंगवासाची शिक्षा, इतर आठ जणांना 16 वर्षांचा कारावास, एका अल्पवयीन आरोपीला दहा वर्षे आणि 11 पोलिसांना एक वर्षांची कैद झाली होती.

साफिया फिरोजी कोण आहेत?

अफगाणिस्तानमधील दुसरी महिला पायलट होण्याचा बहुमान सफिया फिरोजी यांना मिळाला होता. 2001 साली तालिबानचा पाडाव झाल्यानंतर महिलांच्या जीवनमानात बराच सुधार झाला होता. त्याचेच द्योतक म्हणजे फिरोजी सैन्यामध्ये पायलट झाल्या. त्यांच्या आधी निलोफर रहमानी या पहिल्या महिला पायलट होत्या.

स्रोत – Hindustan Times

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, 2015 साली हत्या झालेल्या महिलेचा फोटो चुकीच्या दाव्यासह साफिया फिरोजी यांच्या नावाने व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोतील महिलेचे नाव फरखुंदा असून, कुराण जाळण्याच्या खोटा आरोपातून 2015 साली तिची हत्या करण्यात आली होती. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हा फोटो अफगाणिस्तानातील महिला पायलट साफिया फिरोजी यांचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False