
एका शिवसैनिकाने पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदविला, असा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे या शिवसैनिकाचे टॅटू पाहताना दिसतात.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे.
काय आहे दावा?

मूळ पोस्ट – ट्विटर
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम पाठीवर उद्धव ठाकेर आणि आदित्य ठाकेर यांचे टॅटू गोंदविणारा हा व्यक्ती कोण याचा शोध घेतला. कीवर्ड सर्चद्वारे टीव्ही-9 मराठीची एक बातमी आढळली. यामध्ये या तरुणाची मुलाखत घेण्यात आली आहे.
पाठीवर टॅटू काढणाऱ्या शिवसैनिकाचे नाव रामण्णा जमादार आहे. तो सोलापूर येथील शेळगी भागातील आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी त्याने हा टॅटू काढला असल्याचे त्याने सांगतिले. उद्धव ठाकेर यांना भेटून त्याने हा टॅटू दाखविला.
यामध्ये रामण्णा यांनी संजय राऊत यांचा टॅटू काढल्याचे म्हटलेले नाही. त्यांनी केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाच टॅटू काढलेला आहे.
रामण्णा यांनी फेसबुकवर मूळ फोटो शेअर केलेला आहे. तो तुम्हा पाहू शकता. यामध्ये त्यांच्या पाठीवर केवळ उद्धव ठाकेर आणि आदित्य ठाकरे दिसतात.

मूळ पोस्ट – फेसबुक
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे. मूळ फोटो आणि व्हायरल फोटो यांची तुलना खाली पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो बनावट आहे. मूळ फोटोला खोडसाळपणे एडिट करून चुकीच्या दाव्यासह तो व्हायरल केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Title:Fake News: शिवसैनकाने काढला पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू? फेक फोटो व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: Altered
